देवनागरी
Roman
Press F12 to toggle

झगडा

झगडा

तुझ्या देवळाची वाजवितो घंटा
कोप-यात तंटा जुगा-यांचा.

तुझ्या रे नावाचा लावता शेंदूर
किंकाळी भेसूर बोकडाची.

तुला मी मागतो जीवाचे रक्षण
पोलिस राखण तुझ्यावरी.

तुला रे निःसंगा दागिन्यांचा सोस
तुझ्यापाशी पोच धनिकाला.

बाहेर नि कुणी जोडा पळविला
धन्य तुझी लिळा देवा हरी.

मनाचा या आता मनाशी झगडा
बेगडी हा रगडा दगडापायी.

बाबासाहेब जगताप
९४०३६३२५६५
Babasaheb_jagtap@webdunia.com