मित्रांनो,
परवा एक कविता वाचण्यात आली. आपली विनाशाकडे झुकत चाललेली प्रव्रुत्ती, राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा, मिडियाची मेलेल्याच्या टाळुवरील लोणी सर्वात आधी खाण्यासाठी चाललेली चढाओढ, शिक्षणाचा अभाव आणि त्यातुन निर्माण होणारी विनाशकारी समाजरचना यावर उद्विग्न होउन एका पामरानी मन मोकळ करण्यासाठी पोटतिडीकीने लिहीलेली, व्यावहारीक अर्थशून्य कविता वाचून त्यावर काहीतरी लिहावे असे वाटले.
वाचून आले डोळे भरून विचारांच काहूर उठलं
ठिगळं कशी लावायची रे जेव्हा आभाळचं फाटलं
मला माहीतेय माझे शब्द आत्ता उगाच आलेत फुलून
कसली अस्मिता, कसला पुरुषार्थ गेलीय सांज केव्हाच कलून
हे असच चालु राहणार का?
आणि आपण नुसतं पहाणार का?
कुठेतरी बदलले पाहीजेत आपणच आपले विचार
पुन्हा होऊ नये कोणी दोन श्वासांसाठी लाचार
असचं रहायचं का मित्रा अंधारात चाचपडत
चेहरा फुललेला ठेवायचा अन् मन मात्र कूढत
तुझ्या प्रश्नाचे उत्तर लेका तुला कधीच मिळणार नाही
कुणीही तुझ्यासाठी तुझ्या जिवंत चितेत जळणार नाही
पण थोडातरी आज, माझ्या शब्दांचा मान राख
सगळं जाणणारी असेल तुझी संजीवन राख
त्या राखेतून शिकू आम्ही पुरुषार्थाचे सूत्र
भांगेत भरु, चालू करु संहाराचे सत्र
मेलो तरी असे मरु की आमची राख पुन्हा पुन्हा
उठेल,राहील उभी, अन् करेल सिंह्गर्जना
तुमचा,
केदार
कविता
कविता वाचून वाटल असच वाट्त असेल सर्वाना, बॅलायच कुणी