देवनागरी
Roman
Press F12 to toggle

कच्च्या वयातल्या...

कच्च्या वयातल्या..

कच्च्या वयातल्या
आंबट चिंचा,
लावतो हूरहूर
गोडवा त्यांचा.

कच्च्या वयातल्या
दूढंगी वेण्या,
वक्षावरी स्थिरावती
होऊनी शहाण्या.

कच्च्या वयातल्या
खिदळण्याच्या वेळा,
परक्या डोळ्यांस्तव
मुरडण्याच्या कळा.

कच्च्या वयातल्या
पापण्यांची फडफड,
चुकवीते कितिकांच्या
काळजाची धडधड.

कच्च्या वयातल्या
मेंदीचा रंग,
निरखणारे डोळे
स्वप्नांतून दंग.

कच्च्या वयातल्या
अलवार कळ्या या,
वावरती बागडती
सावलीत काळ्या.

कवी – बाबासाहेब जगताप.
९४०३६३२५६५
babasaheb_jagtap@webdunia.com