ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर
भक्ती आणि प्रेम हे दोन भावविशेष माणसाचे जीवन अधिक समृद्ध करणारे आहेत. कोणत्याही स्थितीत असलेल्याला जगण्यात आनंद वाटावा, अशी स्थिती निर्माण करणारे आहेत. भक्तीत प्रेम असते, पण प्रेमात नेहमी भक्ती असते असे नाही. मुलाच्या आईवरील प्रेमात भक्तीचा काही अंश जरूर असतो, पण आईचे मुलावरील प्रेम हे वात्सल्यमय असते. त्यात भक्तीचा लवलेशही नसतो. ...