तु सांगशील तेव्हा करेन चारोळी,
मज हवी बस एक आरोळी।
तुला लहर यावी कधीही वेळी-अवेळी,
तुझ्याचसाठी रित्या केल्या माझ्या सागरातल्या या काही ओंजळी....
1) वसंत
का करावा दुःखाचा रवंथ,
का कोसावे दुःखा त्या अनंत,
धरावी जराशी आणखी उसंत,
प्रत्येकाच्या लेखी आहेच तो वसंत.
2) गवसणी
हरवलेल्या दिवसातनं आठवणी सापडल्या,
अन् एका मागोमाग एक अशा डोळ्यात तरळल्या.
तुझ्यासाठीचा गजरा तेव्हा तु जसा कुरवाळला,
सुगंध त्या फुलांचा आज मनी दरवळला .
3) पाउलखुणा
आणखी एक वळण आलय रस्त्यावर,
वळणारच आहे, पण मागे वळुन पाहतोय....
जेव्हा आठवतो आजवरचा प्रवास जुना,
परतण्याचा इशारा करतात पुसत चाललेल्या पाउलखुणा.
4) श्राप
माझ्या मनाची कवाडं तुझ्यासाठी सताड उघडी असतात,
पण..
तुझ्याआधी तुझी आठवण येऊन त्यावर थाप देते,
आणि परत न केलेल्या गुन्ह्याबद्दल अघोरी श्राप देते..।
5)
स्पर्ष
क्षण निसटला पुढ्यातनं,
कावरया-बावरया नजरेतनं,
जशी जाणवली अधीरता, तिला माझ्या स्पर्षातनं,
मला सापडली लाज,खळी उमटल्या गालातनं ।
kunikadun kunikade.... ikdun
kunikadun kunikade....
ikdun tikde
माझ्या काही चारोळ्या
6) साक्षीदार
डौलदार नथ,चंद्रकोर भाळी,
कंठी सजल्या मौक्तिक माळा,
सौंदर्याने कळस गाठला,
लावण्याचा रंगला सोहळा ।
घडविणारयाने किमया साधली,
जणू नक्षत्रे केली गोळा,
साक्षीदार अन् मला बनविले,
तीला पाहिले,याचि देही याचि डोळा ॥
7) सुरवंट
अल्लड वयांच्या पायरया मागे टाकुन,
सज्ज झालोय मी करावया साजरा तारुण्याचा जल्लोष,
तरीही चढलेल्या पायरया न् पायरया ओरडताय,
" अजूनही पूर्ण उलगडला नाहीये रे सुरवंटाभोवतीचा कोष".
8) शिडकावा
तु नुसतीच जवळ असतेस माझ्या,
पण तुला जाणवत नाही बेधुंद करणारी हवा ।
प्रणयाचा वर्षाव अभिप्रेत नाहीच् आहे मला,
पण मिळूदे की प्रेमाचा जSSरासा शिडकावा ॥