देवनागरी
Roman
Press F12 to toggle

रोमॅंटीक कविता

ओढणी

गव्हाळ मानेवरी
लव सोनेरी,
तुझी नित्य असे
पखरण ती वरी.
गो-या गालावरती
नित्य खळीचे पडणे,
तिच्याशी तुझे
लाघवी भिडणे.
नाजूक बोटांची
स्पर्श पारायणे,
त्यासाठीच तुझे
पून्हापून्हा घसरणे.
वक्षकमानींवरले
तू एकरंगी इंद्रधनू,
विरळल्या ढगांआड
दूहेरी चंद्रतनू.
कमरेला तुझी
कधी करकच्चून मिठी,
झुरणारे जीव कितिक
तुझा जन्म घेण्यासाठी.

कवी - बाबासाहेब जगताप
९४०३६३२५६५