देवनागरी
Roman
Press F12 to toggle

दिवस तुझ्या सहवासातले...

अनुदिनीकार/प्रेषक: खूप आठवणी,,,
ब्लॉग पत्ता: http://tuzyaaathwani.blogspot.com/
ब्लॉग वर्गीकरण:

समुद्रावरच्या आठवणी... शनिवार, १५ नोव्हेंबर २००८, २१:३३ (+०५:३०)

कित्येक वर्षांनी मित्रांबरोबर समुद्रावर जाण्याचा योग आला होता. जस-जसा समुद्राच्या दिशेने गाडीचा वेग वाढत होता. तस-तसे मन वेगाने भुतकाळात जात होते. जात होते म्हणण्यापेक्षा गाडीमध्ये तर मी पुर्ण भूतकाळातच गेलो होतो. तुझा तो सहवास, मनसोक्त मारलेल्या गप्पा, एकमेकांवर पाणी उडवताना, मी खोल पाण्यात जात असताना तुझे ते केविलवाना चेहरा, प्रेमाच्या आणाभाका, किती-किती आठवणी दाटून येत ...

सुखद स्वप्न... शुक्रवार, २६ सप्टेंबर २००८, २०:५० (+०५:३०)

आज तू मला स्वप्नात येऊन गोड धक्का दिलास ना. तुला खरंच मी कसा सांगू, मी आज किती खूष होतो. तुला किती वर्षांनी मी आज स्वप्नात पाहिले ना. हा आनंद मी शब्दात नाही व्यक्त करू शकत. आज स्वप्नात येऊन तु माझ्याशी किती गं गप्पा मारल्या. हा दिवस मी नाही विसरू शकत. आणि खरचं मला आपले पुर्वीचे दिवस आठवले. पण स्वप्न आठवताना एक खंत सारखी जाणवत होती. ती म्हणजे हे स्वप्न शेअर करायला तु माझ्याबरोबर नाहीस ...

वेडे मन... गुरुवार, १८ सप्टेंबर २००८, २०:५० (+०५:३०)

खरच मन किती वेडे असते ना? कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरी तो फोल ठरतो. तिच्या एका सेकंदाच्या दर्शनाने मन वेडे झाले होते. उद्या 'ती' परत दिसेल. या एकाच आशेवर मन धावत होते. तु त्या रस्त्याने परत-परत जा. तुला नक्की भेटेल. तर दुसरे मन सांगत होते. झाले गेले विसरून जायचे. पण कुठल्या मनाचे ऐकावे समजत नव्हते. या दोन मनांच्या युद्धात काय करावे न काय करू नये हे समजत नव्हते.

"ती'च्या एका ...

अचानक... शनिवार, १३ सप्टेंबर २००८, २०:३७ (+०५:३०)

काही गोष्टी कशा अचानक घडत असतात. तीनही मैत्रीणींबद्दल ओळख करूण देणार आहे. परंतु काल अचानक घडलेली माहिती देणार आहे.

तीन मैत्रीणींपैकी एक मैत्रीण, खूपच प्रेमळ, छान, मला संभाळून घेणारी, आणि माझ्यावर खूप-खूप प्रेम करणारी. चार वर्षापूर्वी शेवटचे पाहिलेले. पाहिलेले म्हणजे कितीतरी वेळ एकत्र घालवलेला. कारण परत कधी भेट होईल की नाही हे माहित नव्हते. कारण लग्नानंतर कधी भेटायचे नाही ...

वचन... शनिवार, ०६ सप्टेंबर २००८, २१:०६ (+०५:३०)

वचन असते ते पाळण्यासाठी,
नाही गं ते तोडण्यासाठी,
आयुष्यभर निभावण्यासाठी,
एकमेकांना भेटण्यासाठी.

पहिल्याच भेटीत माझी झालीस,नाही म्हटले तरी हृदयात घुसलीस,थोड्याच दिवसात माझीच झालीस,ती वेळ कशी तु निभाऊन नेलीस.

आंधळा मागतो एक डोळा, देव देतो.... मंगळवार, ०२ सप्टेंबर २००८, २१:१२ (+०५:३०)

आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे, ही म्हणीचा खरोखरच अनेकांना अनुभव येत असेल. माझ्या बाबतीतही ती तंतोतंत जुळली. खरे सांगायचे तर मी एक साधारण खेड्यातला मुलगा, शिक्षणासाठी शहरात आलेलो. जवळ कोणी उभेही करणार नाही अशी स्थिती. त्यामुळे मैत्रीणी आणि प्रेम तर दुरचीच गोष्ट.

परंतु, शिक्षणामुळे संपुर्ण आयुष्यच बदलून गेले. आणि माझ्या आयुष्यात एकदम तीन मुली आल्या शिवाय ...

आठवण... गुरुवार, २८ ऑगस्ट २००८, २०:४३ (+०५:३०)

कसा जगू मी या आठवणीवरं,
देशील का वचन मला या भूमीवर,
तरंच जगेल मी तुझ्या वचनावर,
सांग कसा जगू मी या आठवणीवर.

स्वप्नात येतेस न निघून जातेस,किती मला तू सारखी चिडवतेस,आश्वासन देऊन मला उठवतेस,किती ग माझी तू, थट्टा ...

प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो.. बुधवार, २७ ऑगस्ट २००८, २१:३२ (+०५:३०)

प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो..
मी, आजपासून `दिवस तुझ्या सहवासातले...` हा ब्लॉग सुरू करत आहे. जर कोणाच्या या ब्लॉमधून भावना दुखवणार असतील तर प्रथमच मी माफी मागतो. माझा कोणाच्याही भावना दुखवण्याचा उद्देश नाही.
हा ब्लॉग सुरू करण्याचा उद्देश म्हणजे, माझ्या भावनांना वाट ...