देवनागरी
Roman
Press F12 to toggle

दर्दभरी गझल

जीवघेणी वंचना....
जीवघेणी वंचना अन् घावगर्द संचिब्ध माझे
गच्च मिटल्या ओठांआड स्थानबध्द शब्द माझे.
गर्द काटेरी फुलांच्या बागेत मी रक्ताळलेला
कर्म आसवे गाळण्याचे विसरूनी डोळे स्तब्ध माझे.
मी प्रसवल्या स्वप्नक्षणांची अर्भके ती बेवारसी
स्वप्नवेडी कूस कापण्या हात आता सिध्द माझे.
तू जिव्हारी घातलेल्या घावांचा मज विषाद नाही
तू केल्या वचनफुलांच्या उधळणीवर मन क्रुद्ध माझे.
काल माझ्या प्रीत फुलांनी भेदरून जोहार केले
जीवन दिसते धूसर आता मरणही संदिग्ध माझे.

बाबासाहेब जगताप
९४०३६३२५६५