Mrudula's space
मुळेकाठच्या एका दुकानात एक गिर्हाईक येते. दुकानदाराचे लक्ष नाही. गिर्हाईक घुटमळते.
शेवटी आपल्या दुकानात चोर शिरला असावा अश्या दृष्टीने पाहून दुकानदार वसकन् त्याच्यावर ओरडतो,
"क्वाय हवांय?"
"अहो, असे अंगावर काय येताय?""मग काय मुका घेऊ तुमचा?"
गिर्हाईक ओशाळते. भीत भीत विचारते,"डिक्शनरी मिळेल काय?""एक का हजार मिळतील, पोटमाळ्यावर हव्व्या तितक्या आहेत.""पण...""पण नाही आणि परन्तु ...