देवनागरी
Roman
Press F12 to toggle

अत्त्यानंद

ब्लॉग शिर्षक: अत्त्यानंद
अनुदिनीकार/प्रेषक: मी अत्त्यानंद
ब्लॉग पत्ता: http://purvaanubhava.blogspot.com/
ब्लॉग वर्गीकरण:

नानुचे इंग्लीश! शुक्रवार, २१ नोव्हेंबर २००८, १९:५७ (+०५:३०)

ही व्यक्ती पूर्णपणे काल्पनिक आहे. योगायोगाने कुणाशीही,कोणतेही साम्य असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

नानु माझा लहानपणचा खास सवंगडी. अभ्यासात तसा यथातथाच होता. अंगाने बर्‍यापैकी जाडसर, उंच म्हणता ...

मामा-भाचा! गुरुवार, १३ नोव्हेंबर २००८, २१:२२ (+०५:३०)

आमच्या कार्यालयात मामा-भाच्याच्या तीन जोड्या होत्या. त्यातील एका जोडीच्या काही मजेशीर आठवणी मी लिहीणार आहे.
ही जोडी म्हणजे पुनेजा(मामा) आणि वालेचा(भाचा) ह्या दोन सिंध्यांची होती. हे दोघेही जवळपास ...

राडा! गुरुवार, ३० ऑक्टोबर २००८, २३:१६ (+०५:३०)

ही गोष्ट आहे साधारणपणे ३० वर्षांपूर्वीची. मी जिथे लहानाचा मोठा झालो त्या मालाडमध्ये आणि आजच्या मालाडमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. तेव्हा वस्ती जेमतेम काही हजारात होती. आज ती दहा लाखांच्याही वर ...

ऐसपैस गप्पा अर्थात वटवट मंगळवार, २८ ऑक्टोबर २००८, १२:०९ (+०५:३०)

मनात आले आणि ध्वनिमुद्रक सुरु केला आणि गेलो बडबडत अखंडपणे. ऐकायचेय माझी वटवट? तर ...

शंकरराव! १ बुधवार, ०१ ऑक्टोबर २००८, २२:०७ (+०५:३०)

नाव काय तुमचं?
शंकर!
चहा घेऊन आलेला पोर्‍या नवीनच दिसत होता. चंदूशेठ चहावाल्या कडे आजवर कितीतरी मुलं काम करून गेली होती. ती बहुतेक सगळीच त्याच्या गावची असायची. शंकरही त्यातलाच.
किती शिकलात?
नाय! काय ...

अजि म्या परब्रह्म पाहीले! रविवार, २८ सप्टेंबर २००८, २३:२३ (+०५:३०)

दरवाज्यावरील पाटी वाचून घंटी वाजवली. दरवाजा उघडायला थोडा वेळ लागला. अर्धवट दरवाजा उघडून त्या व्यक्तीने विचारले कोण हवंय आपल्याला?
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे इथेच राहतात काय?..माझा सवाल!
होय! तशी ...

बालपणीचा काळ सुखाचा! १५ रविवार, १४ सप्टेंबर २००८, १८:२७ (+०५:३०)

माझ्या लहानपणी मी कितीतरी प्रकारचे खेळ खेळलोय.मैदानी खेळात कुस्ती,हुतूतू,लंगडी,खो-खो,आट्या-पाट्या,डब्बा ऐसपैस,पकडापकडी,लगोरी,आबादुबी,तारघुसणी(हा खेळ फक्त पावसाळ्यातच खेळू ...

जयहिंद राव! रविवार, ०७ सप्टेंबर २००८, २२:०१ (+०५:३०)

"देवसाहेब! हे बघा कोण आलेत!"
कार्यालयात प्रवेश करताक्षणीच आमच्या सुरक्षा रक्षकांनी माझे लक्ष वेधले. खरं तर मी साहेब वगैरे काही नाही; पण त्या अर्धशिक्षित सुरक्षारक्षकांपेक्षा जरा दोन बुकं जास्त ...

संगीत चिवडामणी स्वर’बास’कर पंडीत मोदबुवा! गुरुवार, ०४ सप्टेंबर २००८, ००:१४ (+०५:३०)

संगीत आवडत नाही असा माणूस क्वचितच सापडेल.म्हणजेच एकूण काय तर, संगीत सगळ्यांना आवडतं. हां,आता त्याचे प्रकार वेगवेगळे असू शकतात. म्हणजे आपले भारतीय शास्त्रीय अभिजात संगीत,सुगमसंगीत,चित्रपटसंगीत वगैरे करत करत अगदी हल्ली तरुणांच्यात प्रचलित असलेले पॉप/रॅप पर्यंत असे कोणतेही प्रकार असतील.ह्यातला एक तरी प्रकार आवडत असलेला माणूस माझ्या दृष्टीने संगीत रसिकच आहे.तर सांगायचा मुद्दा ...

नार्‍या! गुरुवार, ०७ ऑगस्ट २००८, १६:४५ (+०५:३०)

महाजालावरच्या मराठी संकेतस्थळांवर एक सार्वजनिक काका आहेत.त्या काकांचा सगळ्यात लाडका पुतण्या होता हा नार्‍या. संगणक क्षेत्रातला दादा म्हणून महाजालावर नार्‍याला खास मान होता आणि आजही आहे. तसंच त्याला इतर विषयातही बरीच गती आहे. जसे संगीत,लेखन,खेळ,वादविवाद इत्यादी इत्यादी!

महाजालावरच्या एका मराठी संकेतस्थळावर बरेच सन्माननीय सदस्य होते जे आपापल्या क्षेत्रात नावाजलेले ...