देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Shridhar Phadke Songs - Review

मन मनास उमगत नाही.. शनिवार, ०५ एप्रिल २००८, १२:१९ (+०५:३०)

Ruminations and Musings Blue Crescent

१. मन मनास उमगत नाही
मन मनास उमगत नाही आधार कसा शोधावा
स्वप्नातील पदर धुक्याचा हातास कसा लागावा
मन थेंबांचे आकाश लाटांनी सावरलेले
मन ऩक्षत्रांचे रान अवकाशी अवतरलेले
मन रानभूल मन चकवा...
मन काळोखाची गुंफ़ा मन तेजाचे राऊळ
मन सॆतानाचा हात मन देवाचे पाऊल
दुबळ्या गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा..
चेहरा मोहरा याचा कधी कुणी पाहिला नाही
धनी अस्तित्वाचा तरीही ...

तू माझ्या आयुष्याची पहाट.. शनिवार, ०५ एप्रिल २००८, १२:१५ (+०५:३०)

Ruminations and Musings Blue Crescent

तू माझ्या आयुष्याची पहाट..
तू माझ्या कॆफ़ाची मत्त लाट..

तू मागील जन्मांची आर्त साद..
तू मानसकुंजातील वेणू नाद..

तू माझ्या एकांताचा प्रकाश..
तू माझ्या गीतांचा बाहुपाश..

तू माझ्या दु:खाची चांदरात..
तू माझ्या स्वप्नांचा पारिजात..

तू अम्रुतभासांचा अंग राग..
तू विझल्या नयनांचा दीप राग..

तू माझ्या जगण्याची वाटचाल..
तू माझ्या रक्ताचा रंग लाल..

तू माझ्या ...

कधी रिमझिम शनिवार, ०५ एप्रिल २००८, १२:०९ (+०५:३०)

Ruminations and Musings Blue Crescent

कधी रिमझिम झरणारा आला ऋतू आला
कधी टपो-या थेंबांचा आला ऋतू आला
कधी पुलकित हर्षाचा
हळव्या क्षणस्पर्शाचा..
आला ऋतू आला

पानावर थिरकत नाचे पाणी
मनामध्ये जुळतात गाणी दिवाणी
साद गंधातूनी
ओल्या मातीतूनी
आला ऋतू आला

अंग अंग स्पर्शतात मोती रुपेरी
आठवे ती भेट आधी अधुरी
मन चिंब ओले
शहारत बोले
आला ऋतू आला

हा पाऊस वागे तुझ्यासारखा
हा येतो नि जातो ...

मी एक तुला फ़ूल दिले शनिवार, ०५ एप्रिल २००८, ११:५५ (+०५:३०)

Ruminations and Musings Blue Crescent

मी एक तुला फ़ूल दिले
मी एक तुला फ़ूल दिले सहज नकळता
त्या गंधातून मोहरली माझी कविता..

त्या झरणीतून रुणझुणला शब्द ह्रुदयीचा
त्या शब्दातून मोहरली माझी कविता..

हे गगन निळे चांदण्यात भिजून चिंबले
त्या चांदण्यास कनकाचे साज लाभले
त्या चांद्ण्यास कनकाचे साज लाभता
त्या साजातून मोहरली माझी कविता..

का पान फ़ूल लज्जेने चूर जाहले ?
का सळसळत्या वा-याचे नुपूर वाजले ?

वारा लबाड आहे.. शनिवार, ०५ एप्रिल २००८, ११:५१ (+०५:३०)

Ruminations and Musings Blue Crescent

वारा निघे लपाया
झाडात आड आहे
गिल्ला करुन पाने
सांगून राहिली की
वारा लबाड आहे

झाडात मोहराचे
सारे घबाड आहे
वाकून एक फ़ांदी
सांगून राहिली की
भुंगा उनाड आहे

वाड्यास भोवताली
राई उफ़ाड आहे
पडवीवरील बोले
छपरी उजाड आहे

चोरून दे मुका तू
वस्ती चहाड आहे
वा-यास साखळी ही
सांगून राहिली की
उघडे कवाड आहे..

-- शिरीष गोपाळ देशपांडे..

अबोलीचे बोल ...

रंग किरमिजी.. शनिवार, ०५ एप्रिल २००८, ११:४४ (+०५:३०)

Ruminations and Musings Blue Crescent

रंग किरमिजी
सांज ति-हाईत
मी दुखणाईत
दिठीतली सल
अंधुक चंचल
बघ आंदोलीत
विझता तगमग
आलीस तू मग
पदर सावरीत
क्षण उजळावा
चंद्र फ़िरावा
हीच नसे रीत

जिवलग हात
मूर्तिमंत घात
दंश सराईत
आता सांजरंग
काळीज दुभंग
मना जोजवीत
तुझ्याच पाऊली
जुन्याच चाहुली
कण बोलवीत
आठ्वांचे पीस
गमते आकाश
चंद्र सजवीत

कुठले कुठ्ले
उठ्ले काहूर
मग दूरवर

तल्लीन गोविंदे.... शनिवार, ०५ एप्रिल २००८, ११:४० (+०५:३०)

Ruminations and Musings Blue Crescent

पुष्कळ दिवस अधीरपणे वाट पाहिल्यावर आणि नेहमीच्या दुकानदाराकडे खेपा घातल्यावर ही cassette हातात आली. ती घेतल्यावर मनाचा ठाव घेतला ते त्रिभंगी देहुडा या अभंगाने.. हा अभंग शब्द,स्वर, आवाज, वाद्ये याने असा काही जमला आहे की एकदा ऎकून चॆन पडत नाही.

पहिला अंभंग आहे तो ज्यावरुन शीर्षक दिले आहे तो..

पावया छंदे तल्लीन गोविंदे
नाचती आनंदे गोपाळ कॆसे

यमुनेच्या तीरी गाई चारी हरी

फ़िटे अंधाराचे जाळे शुक्रवार, ०४ एप्रिल २००८, १८:०९ (+०५:३०)

Ruminations and Musings Blue Crescent

फ़िटे अंधाराचे जाळे
झाले मोकळे आकाश
दरीखो-यातून वाहे
एक प्रकाश प्रकाश !
रान जागे झाले सारे
पायवाटा जाग्या झाल्या
सूर्य जन्मता डोंगरी संगे
जागल्या सावल्या
एक अनोखे लावण्य आले भरास भरास..

दंव पिऊन नवेली
झाली गवताची पाती
गाणी जुनीच नव्याने
आली पाखरांच्या ओठी
क्षणापूर्वीचे पालटे जग उदास उदास..

झाला आजचा प्रकाश
जुना कालचा काळोख
चांदण्याला ...

अवेळीच केव्हा दाटला अंधार शुक्रवार, ०४ एप्रिल २००८, १२:०९ (+०५:३०)

Ruminations and Musings Blue Crescent

अवेळीच केव्हा दाटला अंधार
तिला गळा जड झाले काळे सर
एकदा मी तिच्या डोळ्यात पाहिले
हासताना नभ कलून गेलेले

पुन्हा मी पाहिले तिला अंगभर
तिच्या काचोळीला चांदण्याचा जर
आणि माझा मला पडला विसर
मिठीत थरके भरातील ज्वार

कितीक दिसांनी पुन्हा ती भेटली
तिच्या पोटी कुण्या राव्याची सावली
जरा डोळियांत तिच्या मी पाहिले
काजळात चंद्र बुडून गेलेले

ना.धों.महानोर

तुला पाहिले मी नदीच्या किनारी गुरुवार, ०३ एप्रिल २००८, १४:५४ (+०५:३०)

Ruminations and Musings Blue Crescent

तुला पाहिले मी नदीच्या किनारी
तुझे केस पाठीवरी मोकळे

तुझी पावले गे धुक्याच्या महाली
ना वाजली ना कधी नादली
निळा गर्द भासे नदीचा किनारा
न माझी मला अन तुला सावली

मनावेगळी लाट व्यापे मनाला
जसा चंद्र हा डोंगरी मावळे
पुढे का उभी तू तुझे दु:ख झरते
जसे संचिताचे ऋतू कोवळे

अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून
आकांत माझ्या उरी केवढा
तमातून ही मंद ता-याप्रमाणे