देवनागरी
Roman
Press F12 to toggle

गाढव

ब्लॉग शिर्षक: गाढव
अनुदिनीकार/प्रेषक: gadhav
ब्लॉग पत्ता: http://gadhav.blogsome.com
ब्लॉग वर्गीकरण:

Marathi blog

मानसशास्त्र २/३ रविवार, १८ मार्च २००७, १६:०३ (+०५:३०)

मानसशास्त्र २

३४० ने घरी चाललो होतो. शेजारी एक तरूण जेमतेम २०-२५ चा असेल. त्याने तंबाखू काढली, मला offer केली.
हसत नको म्हणालो. माझ्याकडे पाहत हसत म्हणाला:
“मै भी खाता नही था पहले, लेकिन मजबूरी मे आदत पड गयी. कॉलेज मे था तो पुरा ...

सुहास सोमवार, २१ ऑगस्ट २००६, १७:४१ (+०५:३०)

संगणकामुळे बऱ्याचजणांचे आयुष्य बदलले. चांगले - वाईट परिणाम झाले. त्याचे एक उदाहरण. बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यांमुळे काही तांत्रिक शब्द आठवत नाहीत.

 नोकरीला दोन-तीन महिने झाले होते. एका रविवारी सुहास घरी आला. मी ...

मी आणि गाढवं - ३ बुधवार, १६ ऑगस्ट २००६, १७:३९ (+०५:३०)

कोल्हापुराला निवड झाली असा कमलेशचा मेसेज आला. रविवारी संध्याकाळी तो घरी भेटायला आला.

काय रे कधी चाललाय कोल्हापुराला?

-वेळ आहे अजून, एक-दीड महिना तरी लागेल.

तू तर निवड झाली म्हणून SMS पाठवला होता.

- तसं confirm आहे. पण कॉल लेटर ...

गाढव आणि अर्थशास्त्र - १ गुरुवार, २७ जुलै २००६, ०९:३६ (+०५:३०)

शिक्षण झाल्यानंतर नोकरी करावी या हेतूने कॉम्प्युटर क्लास लावला. जॉब गॅरंटी देणारा एक महागडा क्लास मित्राच्या मदतीने शोधला, पैसे भरले. क्लास सुरू झाला, संपला. नोकरी मिळाली. नंतर क्लासचा आणि माझा संबंध संपला. पुढे माझ्या ...

मंदिर आणि गाढव बुधवार, १९ जुलै २००६, १०:२० (+०५:३०)

पुतळे दंगली घडवू शकतात हे सरकारला पटल्यामुळे शेवटी सरकाराने पुतळ्यांवर बंदी आणली. आधी उभारलेल्या पुतळ्यांचे विसर्जन करण्याचे ठरले.

गाढव समाजासाठी गाढवतोड मेहनत केलेल्या एका गाढव नेत्याचे एक मंदिर चौकातच होते. दुसऱ्याच ...

बॉम्बस्फोट आणि गाढव बुधवार, १२ जुलै २००६, १४:१३ (+०५:३०)

आज दिनांक १२/०७/२००६. सकाळी गाढवाप्रमाणे उठलो. गाढवलेली कामे केली. TVवर मस्तपैकी कालच्या बॉम्बस्फोटाची चित्रे पाहिली. पोलीस, अतिरेकी, सोनिया, लालू, देशमुख, काँग्रेस, मुस्लिम आणि माहीत असलेल्या सर्वांना मनसोक्त गाढव शिव्या ...

सोनू सोमवार, १० जुलै २००६, १६:३० (+०५:३०)

अंधेरी, लोखंडवाला कॉम्प्लेक्स या तथाकथित सुशिक्षित, उच्चभ्रू वसाहतीने घेतलेला एक बळी उघडकीस आला.
१० वर्षाच्या सोनूला लिपस्टिक लावली म्हणून ठार मारण्यात आले. महिना ८०० रु. पगार होता तिला.
सोनूला मारताना क्रूरपणाचा कळस ...

गाढवप्रश्न - १ सोमवार, १० जुलै २००६, १२:३५ (+०५:३०)

या गाढव समाजात वावरताना मला बरेचदा काही प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत.

आपण का जगतो? इतर प्राणी, झाडे, पक्षी का जगतात?
बरे फक्त जगतच नाही तर नवीन जीवांना जन्मदेखील देतो.
इतरांच ठीक आहे निसर्गानं आखून दिलेल्या रस्त्याने ...

आज्जा शुक्रवार, ०७ जुलै २००६, ११:३२ (+०५:३०)

माझ्या आज्ज्याला मी नोकरीला जाण्याचा भारी अभिमान होता.
आमच्या पूर्णं खानदानात १५वी शिकलेला मी एकटाच होतो, त्यात नोकरी म्हणजे "सोनेपे सुहागा".
त्याच्या मित्र मंडळीत तो हि गोष्ट मोठ्या अभिमानाने सांगायचा.

पण मी कामाला ...

मानसशास्त्र - १ शुक्रवार, ०७ जुलै २००६, ०९:३५ (+०५:३०)

झोपडपट्टीतल्या गल्लीत शेवटच्या टोकाला आमचे घर, समोर गुप्ता आणि दोन-चार घरे सोडल्यावर बांगडीवाल्याचे घर.
बांगडीवाल्याने नवीन "टेप रेकॉर्डर" घेतला होता.
मिळेल त्या वेळेस नव्या-जुन्या हिंदी गाण्याचा आस्वाद त्याचे घर घेत ...