देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Faljyotisha Chikitsa Mandal

ब्लॉग शिर्षक: Faljyotisha Chikitsa Mandal
अनुदिनीकार/प्रेषक: Prakash Ghatpande
ब्लॉग पत्ता: http://faljyotishachikitsa.blogspot.com/
ब्लॉग वर्गीकरण:

फलज्योतिष चाचणीचा अहवाल गुरुवार, ०९ ऑक्टोबर २००८, १८:०६ (+०५:३०)

फलज्योतिष चाचणी प्रसिद्ध झालेवर १-२ दिवसातच आम्हाला अंदाजे १५० दुरध्वनी आले. विचारणा करणा-या व्यक्ती महाराष्ट्रभर पसरलेल्या होत्या. आम्ही त्यांना पोस्टाची तिकीटे असलेला लिफाफा व विहित नमुन्यातील स्वत:बद्दलची माहिती पाठवण्यास सांगितले.
दरम्यान एक ज्योतिषांचे मंडळ श्री सुधाकर कुंटे यांना भेटले. या मंडळात प्रमुख श्री श्री श्री भट अध्यक्ष महाराष्ट्र ज्योतिष परिषद , श्री ...

Press Conference - Astrology Survey रविवार, ०५ ऑक्टोबर २००८, १२:४० (+०५:३०)

पत्रकार परिषदेचे निमंत्रण

मा. संपादक
स. नमस्कार

सुप्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ डॊ. जयंत नारळीकर यांचीफलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी या एका वेगळ्या विषयावरील पत्रकार परिषद आयोजित केली आहे. आपल्या लोकप्रिय दैनिकाचा प्रतिनिधी यासाठी पाठवावा ही विनंती.
स्थळ:- पत्रकार भवन, नवी पेठ पुणे;
दिनांक व वेळ :- मंगळवार दि. ७ आक्टोंबर २००८, दुपारी ४.०० वाजता.

फलज्योतिष चाचणी समन्वय शुक्रवार, ०३ ऑक्टोबर २००८, १४:५८ (+०५:३०)

फलज्योतिष चाचणी समन्वय

चाचणीची पार्श्वभूमी
"फलज्योतिष चिकित्सा मंडळ" या अनौपचारिक संवादी भुमिकेतुन कै. माधव रिसबुड व मी १९८८ पासुन फलज्योतिषाची चिकित्सा करत असु. त्यातुनच ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातुन सुसंवाद या पुस्तकाचा २००१ मध्ये जन्म झाला. पुस्तक प्रकाशन माधव रिसबुडांच्या हस्ते झाले. प्रकाशनाच्या निमित्ताने ज्योतिषी नंदकिशोर ...

माधव रिसबूड : एक कठोर फलज्योतिष चिकित्सक बुधवार, ०१ ऑक्टोबर २००८, २०:३८ (+०५:३०)

सप्टेंबर २००८ चा अंधश्रद्धा निर्मुलन वार्तापत्र चा ज्योतिष विशेषांक पाहिला अन माधव रिसबुडांची आठवण तीव्रतेने झाली. खालील लेख खरं तर मी अंनिस वार्तापत्राच्या दिवाळी अंकासाठी लिहिला होता. अंनिस वार्तापत्रात रिसबुडांनी ज्योतिष चिकित्सेवर अनेक लेख लिहिले होते. अंनिसची अनेक ठीकाणी वकीली केली होती. अंनिस चे हितचिंतक असलेल्या या कठोर फलज्योतिष चिकित्सकावर लिहिलेला लेख ...

फलज्योतिषाला विज्ञानाचा आधार आहे काय?" बुधवार, ०१ ऑक्टोबर २००८, १९:२० (+०५:३०)

"फलज्योतिषाला विज्ञानाचा आधार आहे काय?"
या विषयावर "वाचकांचे व्यासपीठ" या सदरात अठरा पत्रे प्रसिद्ध झाली आहेत.(दै.सकाळ शनिवार३१ मे २००८).त्यांत श्री. प्रकाश घाटपांडे यांचे पत्र केंद्रस्थानी ठळक टंकात छापले आहे ते येणे प्रमाणे:

....
वैज्ञानिक चिकित्सेकडे ज्योतिषांची नेहमीच पाठ
प्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी फलज्योतिषाची संख्याशास्त्रीय चाचणी घेण्याचे ...

चित्रमय जगत मंगळवार, ०९ सप्टेंबर २००८, १४:२३ (+०५:३०)

फलज्योतिष संबंधाने विचारी माणसाचे कर्तव्य
फलज्योतिष संबंधाने विचारी माणसाचे कर्तव्य' या चित्रमय जगत च्या जानेवारी १९२१ च्या अंकातील लेखात सत्यावेषीलिहितात," .........एक कमिटी स्थापन करावी व तिने गणित व तर्कशास्त्राचा अभ्यास केलेल्या विद्वानास या शास्त्राच्या संशोधनाचे कामी निधितुन द्रव्यसाहाय्य द्यावे. या शास्त्राचा शोध करणारांस तर्कशास्त्राचे ज्ञान असणे का ...

नशीब शनिवार, ०६ सप्टेंबर २००८, १२:४३ (+०५:३०)

नवमस्थान हे प्रारब्ध संचित भाग्य यांचे स्थान आहे. तुम्हाला नशीबाची किती साथ आहे हे पहाण्यासाठी नवमस्थानातील ग्रह,नवमस्थानातील ...

ज्योतिषांची वर्गवारी मंगळवार, १९ ऑगस्ट २००८, ११:५४ (+०५:३०)

ज्योतिषांची वर्गवारी
पारंपारिक, हौशी, व्यावसायिक, आधुनिक अशी ज्योतिषांची वर्गवारी करता येईल. घराण्यात असलेला ज्योतिषाचा पारंपारिक व्यवसाय पुढच्या पिढीने स्वीकारला तो झाला पारंपारिक ज्योतिषी. पंचांग पहाता येते व पुजा सांगता येते एवढ्या मर्यादित भांडवलावर धार्मिक परंपरेचा भाग म्हणून जरी ज्योतिषाचा व्यवसाय एखाद्या पुरोहित कम ज्योतिषाने केला तरी तो पारंपारिक ...

ज्योतिषी कुणाला म्हणायचे? रविवार, १० ऑगस्ट २००८, १४:०९ (+०५:३०)

ज्योतिषी कुणाला म्हणायचे?
ज्योतिषी कुणाला म्हणायचे यात ज्योतिषांमध्येच मतभेद आहेत. अनेक मान्यवर ज्योतिषांच्या स्वत:च्या ज्योतिष संस्था आहेत. त्यात ज्योतिषपंडीत ज्योतिषशास्त्री, होराभुषण, होरामार्तंड अशा उपाधी वा पदव्या देणारे अभ्यासक्रम असतात. त्याची फी असते. ती भरुन जो अभ्यासक्रम पुर्ण करतो असे त्या ज्योतिषसंस्थाचालकाला वाटते त्याला तसे संस्थेकडुन त्या ...