देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Weltanschauung

ब्लॉग शिर्षक: Weltanschauung
अनुदिनीकार/प्रेषक: Raina
ब्लॉग पत्ता: http://puriyadhanashri.blogspot.com
ब्लॉग वर्गीकरण:

Hi,
These are my thoughts on things that matter to me..

वाचू आनंदे बुधवार, ११ जून २००८, ११:२० (+०५:३०)

"वाचू आनंदे " ही चार पुस्तकांची मालिका अप्रतिम आहे !!! बाल गट -१ & २ आणि कुमार गट १ & २ असे चार भाग. प्रत्येक भागाचे मूल्य ७५ रु (फक्त)- ज्योत्सना प्रकाशन आणि राज्य मराठी विकास संस्था यांचे संयुक्त प्रकाशन. संपादन: माधुरी पुरंदरे आणि साहाय्य: नंदिता वागळे. चित्रांचे मुद्रण सुरेख! कृष्णधवल असून सुद्धा जराही रसग्रहणात बाधा येत नाही. कविता, गद्य साहित्यातील उता-यांची निवड वादातीत ...

Homecoming and more... सोमवार, १२ मार्च २००७, ००:०५ (+०५:३०)

एकदाचं घरी internet connection आलं. ते मिळवायला किती रक्त आटलं आणि मिळवलेलं पाहिजे तेव्हा किती वापरता आलं, हा एका स्वतंत्र postचा विषय आहे. (Thanks to Hathway, the ISP company, whose downtime is more than their uptime,one spends more than what it costs for the connection, for phone calls to their so-called 24*7 call center, where the engineers take vacation on all weekends, and all public holidays. So if you feel ...

शरदोत्सव जपान २००६ शुक्रवार, ०९ मार्च २००७, १०:२८ (+०५:३०)

सेन्दाईत दाखल झालो. वाटेत शरदाच्या लाल पिवळ्या खुणा सगळीकडे भेटत होत्या. पण ऐन बहर ओसरुन आता भकास लाल, केशरी छटा दिसत होत्या. हे म्हणजे चांगल्या नाकी-डोळी निटस असणा-या नववधूचा, हळदकुंकवाच्या मळवटानी अंबाबाई अवतार झालेला असावा ...

बाई बास करा आता ! गुरुवार, २२ फेब्रुवारी २००७, ०८:२० (+०५:३०)

शनिवारी 'नक्षत्रांचे देणे" ह्या कार्यक्रमाचा (२७ वा) आणि शेवटचा भाग पाहिला. आणि पुन्हा एकदा अनुराधा मराठेंचे गायन ऐकून वाईट वाटले.
बाईंचा आवाज पाSSSर गेलाय. नव्या को-या भांड्यांवर बोट फिरवल्यावर जसा च्यय्य्य्य्क आवाज येतो- तसा ...

The Story of Barefoot Gen ह्या जपानी anti-war/anti-nuke story चा अनुवाद (भाग ४-६) सोमवार, २० नोव्हेंबर २००६, ११:४३ (+०५:३०)

(4)

एक दिवस एक पोलिस बाबांकडे आला आणि म्हणाला " तुमची चौकशी करायची आहे. ताबडतोब पोलीसचौकीवर हजर व्हा". बाबांना हातकड्या अडकवून, त्यांना तो पोलिसचौकीवर घेऊन गेला. बाबांना गार फरशीवर ओणवं केल्या गेलं आणि सोट्यानी मारहाण केली ...

मराटी पाउल पडते पुढे सोमवार, २० नोव्हेंबर २००६, ११:४१ (+०५:३०)

जपानला आल्यावर जे अनेक धक्के बसतात (भुकंपासकट) त्यातिल एक म्हणजे “चालणे” अर्थात “पदयात्रा”. होतं काय, की पुण्यात कायम बुडाखाली दुचाकीवाहनं नाहीतर तिनचाकी रिक्षा- शिवाय आणि दुचाकी वाहन हे हत्यार चालवणे या अर्थि. आणि ...

The Story of Barefoot Gen ह्या जपानी anti-war/anti-nuke story चा अनुवाद शनिवार, ०४ नोव्हेंबर २००६, ००:०० (+०५:३०)

हादाशी नो गेन- The Story of Barefoot Gen ह्या जपानी anti-war/anti-nuke story चा अनुवाद.

(1)
गेन नाकाओका- आपल्या गोष्टीचा नायक, हिरोशिमात जन्मला आणि वाढला. तो प्राथमिक शाळेत जाऊ लागला त्या सुमारास, जपानची ब्रिटन आणि अमेरिकेविरुद्ध लढाई चालू होती.

तोक्योतला गणेशोत्सव वंदना गुप्ते आणि राणी वर्मांबरोबर बुधवार, ११ ऑक्टोबर २००६, १९:२१ (+०५:३०)

काही क्षणचित्रे
Link to the official report on Tokyo Marathi Mandal's website.
http://www.sutra.co.jp/marathi/newSite/main.html

उत्सवमुर्ती.

वंदना गुप्ते आणि राणी वर्मा "ती" हा कार्यक्रम सादर करताना

भावनेला येवू दे गा.... शुक्रवार, ०८ सप्टेंबर २००६, ०९:३० (+०५:३०)

झोपेनी असहकार पुकारला होता. म्हणून ८ * २ फुटांच्या, खास जपानी घरांच्याच असू शकतील अशा छोट्याशा गॅलरीत आम्ही दोघं बसलो होतो. ती गॅलरी ईतकी अरुंद आहे, की मी थोडी जाड झाले तर मला तिरकं होऊन कपडे वाळत घालायला लागेल. असो. तर त्या ...

भुकंपासाठी (प्रयत्नपूर्वक) सुसज्ज जपान गुरुवार, ०७ सप्टेंबर २००६, ११:१८ (+०५:३०)


मागच्याच आठवड्यात एक भुकंप झाला. तसे नेहमीच होतात- पण हा जरा विशेष जाणवण्यासारखा होता. त्याच्या दुस-याच दिवशी- १ सप्टेंबर ला- १९२३ च्या Great Kanto Earthquake च्या anniversary निमीत्ताने जपानमध्ये मोठी Earthquake Drill होती. ...