देवनागरी
Roman
Press F12 to toggle

प्रवास आसुनये असा...

विरार

पश्चिम रेल्वेचे लोकलचे शेवटचे स्टेशन. तथापि, सकाळच्या वेळी या स्टेशनवरून चढणाऱ्या प्रवाशांना बसायला नव्हे तर उभे राहायलाही जागा मिळणे मुश्किल असते कारण वसई आणि नालासोपारा येथून प्रवासी उलट बसून आलेले असतात. त्यामुळे विरारच्या प्रवाशांत नेहमीच असंतोष खदखदत असतो. तरीही त्यांनी ग्रुप बनवून त्यातून प्रवास सुसह्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विरारच्या प्रवाशांत डहाणू, पालघर, तारापूर येथून शटलने येणाऱ्या प्रवाशांची भर पडत असते. आधीचे सात प्लॅटफॉर्म आणि नवा बांधण्यात आलेला आठवा प्लॅटफॉर्म यामध्ये खूपच अंतर. या प्लॅटफॉर्मला जोडणारा मुख्य रस्ता म्हणजे चिंचोळी वाट आहे. या वाटेवर अनेकदा दिवेही नसतात. जुन्या सात प्लॅटफॉर्मला जोडणारा एकच फूटओव्हर ब्रिज. अनेक वर्षांच्या मागणीनंतर भुयारी मार्ग बनवून हे प्लॅटफॉर्म जोडण्यात आले. परंतु, वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेने फारच अपुरे आहेत. विरारच्या पूर्व आणि पश्चिमेकडून बाहेर पडण्यासाठी अद्यापही गल्ल्याच आहेत. स्टेशनबाहेर पडल्यावर नवख्या प्रवाशाला कोठून कोठे कसे जायचे तेच समजत नाही. खड्डे आणि उंचवट्यांमुळे जिकीरीच्या बनलेल्या चिंचोळया रस्त्यावरून भरधाव जाणाऱ्या रिक्षा आपल्या पायांवरून तर जाणार नाहीत याची सतत भीती वाटत राहते. बाहेरगावी जाणाऱ्या-येणाऱ्या काही गाड्या येथे थांबतात. त्यामुळे जंक्शनच्या दर्जाचे हे स्टेशन असूनही अत्यंत दुर्लक्षित ठेवण्यात आले आहे. ३,४,५ या प्लॅटफॉर्मवरून बाहेरगावच्या गाड्या आणि ६ व ७ वरून डहाणूसाठी मेमू गाड्या जातात. तर १,२ आणि ८ प्लॅटफॉर्मवरून लोकलगाड्या सुटतात. त्यापैकी एक क्रमांकाचा फलाट अतिशय खराब आहे. काही भागात पाणी तुंबून चिखल होतो. टॉयलेट समोरील भागात उंचवटा आहे. ४ आणि ५ क्रमांकांच्या प्लॅटफॉर्मना कचराकुंडीचे स्वरूप आलेले आहे. मेमूचा प्लॅटफॉर्म थेट फाटकात उतरतो. पण त्याला पायऱ्या नाहीत. याच फाटकातून असंख्य प्रवासी अंधारातून वाट काढत असतात.

नालासोपारा

सर्वाधिक म्हणजे २०० टक्क्यांहून अधिक वेगाने वाढत असलेला परिसर म्हणून नालासोपारा ओळखले जाते. साहजिकच या स्टेशनवरून डाऊन आणि अप अशा दोन्ही लोकलगाड्यांत सकाळी चढणे म्हणजे एक दिव्य असते. अधेर् प्रवासी विरारला 'डाऊन' जातात. त्यामुळे त्यांना विरारकरांच्या उदेकांचे अनेकदा लक्ष्य बनावे लागते. चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकलमध्ये पाठीमागच्या प्रवाशांच्या प्रचंड दाबाने डब्यात चढत असताना एखाद्याचा कोणालातरी धक्का बसतो, पायावर पाय पडतो, हाताचा मार बसतो आणि मग थोडावेळ हमरीतुमरीवर येऊन हातघाईवर येऊ पाहणारे प्रकरण मिटविले जाते. नवे दोन प्लॅटफॉर्म झालेले असले तरी लोकल गाड्या जुन्याच प्लॅटफॉर्मवरून जातात. या प्लॅटफॉर्मची क्षमता अत्यंत अपुरी आहे. त्यामुळे गदीर् प्रचंड होते. नालासोपाराच्या पूवेर्कडेच पूवीर् लोकसंख्या होती, आता पश्चिमेकडेही प्रचंड वेगाने वस्ती वाढत आहे. याची कोणतीही दखल रेल्वे प्रशासनाने घेतलेली नाही. प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी दोन्ही बाजूने अत्यंत अपुरी जागा आहे. फेरीवाल्यांचे आक्रमण आहेच. तिकिट खिडक्याही अत्यंत अपुऱ्या आहेत.

वसई रोड

जंक्शनचा दर्जा मिळालेले वसई रोड स्टेशन म्हणजे पाच-सहा प्लॅटफॉर्म असलेला एक तबेला आहे. कोकण रेल्वेमागेर् येणाऱ्या राजधानी एक्स्प्रेससह अनेक लांबपल्ल्यांच्या गाड्या येथे थांबतात परंतु, कोणत्याही प्रकारच्या सुविधा प्रवाशांना मिळत नाहीत. सकाळी पाचसहा लोकलगाड्या येथून चर्चगेटच्या दिशेने सोडण्यात येत असल्यामुळे काही प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. या लोकलगाड्या नव्याने बांधण्यात आलेल्या एक क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवरून सोडण्यात येतात. हा प्लॅटफॉर्म अत्यंत अपुरा आहे. त्यामुळे लोकल गाडी येण्याच्या वेळी या प्लॅटफॉर्मवर उसळत असलेली गदीर् पाहून नवख्याची छाती दडपून भोवळ येते. विरारहून येणाऱ्या लोकलमध्ये चढणाऱ्या प्रवाशांना डब्यात शिरणेही शक्य होत नाही. कारण बोरिवलीला उतरणाऱ्या प्रवाशांनी दरवाजे अडवून ठेवलेले असतात. आत शिरतात त्यांना एका पायावर उभे राहून भाईंदर, मिरा रोड, दहिसर येथून येणाऱ्या प्रवाशांचे धक्के सहन करावे लागतात.

नायगाव

कोणतीही वर्दळ नसलेल्या नायगाव स्टेशनावरही आता गदीर् दिसू लागली आहे. त्यामुळे सध्या असलेल्या सर्वच सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. दोन्ही बाजूला तिकिटघरे आहेत, परंतु, त्यापैकी अनेक बंद असतात. पूवेर्कडच्या प्रवाशांना जाण्यायेण्यासाठी पुरेसा रस्ता नाही. आहे त्या रस्त्यावरील पूलही धोकादायक बनला आहे. लोडशेडिंगच्या काळात तर पूर्ण अंधार असतो. या बाबीकडे लक्ष देण्यास रेल्वे तयार नाही. पश्चिमेकडेही हाच प्रकार आहे. रेल्वेकडे जागा असून पाकिर्ंगसाठी, रिक्षा स्टँडसाठी जागा उपलब्ध करून दिली जात नाही.

भाईंदर

अत्यंत गदीर्चे स्टेशन म्हणून भाईंदर प्रसिद्ध आहे. कोणत्याही वेळी या स्टेशनांवरून प्रवाशांच्या झुंडी लोकलमध्ये शिरत असतात. प्रवाशांनी अनेक वेळा उग्र आंदोलने केल्यानंतर भाईंदर लोकल सोडण्यात येऊ लागल्या आहेत. पंरतु, दर पंधरा मिनिटाला लोकल सोडूनही येथील गदीर् कमी होणार नाही. स्टेशनाच्या बाहेर तर चिखलाचेच साम्राज्य. रेल्वे प्रशासन आहे, असे येथील प्रवाशांना कधी जाणवत नाही.

मिरा रोड

मिठागराच्या पार्श्वभूमीवर पूवीर् उठून दिसणारा मिरा रोडचा पूवेर्कडील परिसर टॉवरनी पूर्ण भरून गेला आहे. गदीर् वाढत आहे. हे लक्षात घेऊन रेल्वेने येथे प्रवाशांना प्राथमिक सुविधा पुरविण्यासाठी उपाययोजना केली पाहिजे, नाही तर पश्चिमेकडील भागात वस्ती झाल्यावर जागा मिळणार नाही. कारण मिठागरे उठविण्याचा प्रयत्न सध्या सरकारी पातळीवरच चालू आहे. विरार ते मिरारोड या दरम्यानतील प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी रेल्वेशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे सर्व प्रवाशांचा ओघ रेल्वेकडेच असतो. हे लक्षात घेऊन प्रत्येक स्टेशनकडे जाणारे रस्ते मोठे असावेत, तिकिट खिडक्या पुरेशा असाव्यात, किमान पाच मिनिटांनी लोकल मिळावी इतक्या किमान अपेक्षा येथील प्रवाशी बाळगून आहेत.

bhik nako pan

i am usual traveller fr saphale, i totally agree with ur suggestions, i want to write in marathi, but donot know how to write

To write in marathi