Remichi Marathi Boli
बाप माझा - एक महाकाव्य
विस्मरणाच्या धुक्यातून ते क्षण
मावळतीच्या किरणांत
लख्ख चमकले क्षणभर।
तेव्हा माझा बाप चालता बोलता
महायात्रेस निघून गेला होता ।
त्याच्या कलेवराच्या चेहरयावर
तेव्हासुघ्धा तृप्तीचे शांत
भाव चिकटून होते
आणिक अंगावर फक्त
हातभर सूती लंगोट ।
सुखी माणसाचा सदरा शोधणारया राजास
माझ्याच बापाने तर फसवले
नव्हते ना?
पण ...