देवनागरी
Roman
Press F12 to toggle

गेस्टरूम

सिनेमाला न जाणे... रविवार, १३ एप्रिल २००८, २३:५८ (+०५:३०)

आस गेस्टरुम-संदीप खरे

३० - ३ - २००८

एकदा काय झालं...
एक होता ' तो ' ... एक होती ' ती ' ... आणि एक होता सिनेमा!
तिघांनी एकदा भेटायचं ठरवलं...
एकमेकांना पहायचं ठरवलं;
ठरवलं; पण घडलं मात्र नाही...
कशाला तरी घाबरून, कशावर तरी रागावून ती आलीच नाही...
मग त्याने एकट्यानेच थिएटरसमोरच्या बाकड्यावर ठाण मांडलं...
ती येणार नाही माहित असून वाट पाहिली... ती आली नाहीच! कधीच!
कुणी नव्हतंच बोलायला... मग त्याने ...

रात्र रात्र सोशी रक्त... रविवार, १३ एप्रिल २००८, २३:५७ (+०५:३०)

आस गेस्टरुम-संदीप खरे

२२ - ३ - २००८

खूप जागलो. इंजिनिअरिची सबमिशन्स, कधी कार्यक्रमांचे दौरे, नाटकाच्या रिहर्सल्स, 'बालगंधर्व'जवळ पुलावरच्या गप्पा, सायकलवरची भटकंती, कधी उगाचच एकट्यानेच वडाच्या पारावर दिलेला डेरा! एकदा तर शेवटची लोणावळा लोकल गाठून आम्ही ६-७ मित्रांनी मुद्दामून विनातिकिट प्रवास करून लोणावळा गाठलं. (ते थ्रिल कायदेशीररित्या इन्कमटॅक्स बुडवण्यात नक्कीच नाही!) टिसीनी पकडलं... ...

निरोप रविवार, १३ एप्रिल २००८, २३:५६ (+०५:३०)

आस गेस्टरुम-संदीप खरे

५ - ४ - २००८

कवी, गीतकार संदीप खरे यांचा गेस्टरूम सदरातला हा शेवटचा लेख. निरोप घेणारा...
..........
( १)

दुसरीतला एक मुलगा खूप अस्वस्थ आहे. पोटात सारखा गोळा येतोय त्याच्या... डोळे आतून गरम झालेत. आजोळी आलाय काही दिवसांसाठी. आणि आता थोड्याच वेळात पुन्हा घरी जायचंय... ७-८ दिवस खूप खेळलाय, मजा केलीय, लाड झालेत. पण खरं सांगायचं तर आल्या दिवसापासून त्याला भीती वाटतेय ती याच क्षणाची. ...