देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Marathi / मराठी

उरलं‍-सुरलं शनिवार, २७ डिसेंबर २००८, १३:१२ (+०५:३०)

a Sane man Sane inSane

ती रोजच्याच नेमाने
क्षितिजावर उमटे रेघ
विरघळते बरेच काही
मज दिसतो केवळ मेघ

सनातन काळोख येतो
घेऊन नवा कल्लोळ
अन त्याची नांदी गाते
पक्ष्यांची भ्याली ओळ

त्या तसल्या भयाण काळी
मज नसते कसले भान
किंवा सवयीने बहुदा
मज जमेल तसली तान

सवयीने सगळे जमते
साहणे त्रास तर खास
जगण्याला विटलेलाही
सवयीने घेतो श्वास

समजावतो मीच मजला
ना अजून झाली रात्र

स्पिरीट गुरुवार, ०४ डिसेंबर २००८, ०८:५५ (+०५:३०)

a Sane man Sane inSane

स्पिरीट हे एक प्रकारचे अल्कोहोल आहे
आपल्या प्रभावाखाली अनियंत्रित कृती करण्यास प्रवृत्त करणे
हा अल्कोहोलचा गुणधर्म आहे
धुंदी, नशा, व्यसन ह्यांचे नाते विलक्षण आहे
"व्यसने मित्रपरीक्षा" होत असल्याने
त्या परीक्षेत वारंवार उत्तीर्ण होणारा माणूस
ओघानेच व्यसनाधीन होत जातो.

स्पिरीटचे दिवेही असतात
साधारणपणे विज्ञानप्रयोगांच्या साहित्यात ते आढळतात
जळणे हाही ...

भय इथले संपत नाही सोमवार, १० नोव्हेंबर २००८, २३:०४ (+०५:३०)

a Sane man Sane inSane

भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो
तू मला शिकविली गीते
‍‍- ग्रेस.

***

ऐकता चंद्रही निजला; भय इथले संपत नाही.
हा अनंतभैरव तिजला- भय इथले संपत नाही.

सांगतील जाउन ओल्या, ज्या ...

सुसंस्कृत बुधवार, २९ ऑक्टोबर २००८, ११:०२ (+०५:३०)

a Sane man Sane inSane

साप अजून सुसंस्कृत आहेत.

कुठल्याशा इसमानं लोळवलं एकाला
म्हणून अखिल सर्पजातीच्या अस्तित्त्वाचे प्रश्न
त्यांना अद्याप पडलेले नाहीत.
नि तमाम सर्पजातीच्या रक्षणाचा मक्ता कुणीही न सांगता घेऊन
खलनिग्रहणाय पेटून उठण्यासाठी उद्युक्त करणारं
सूडदार विष अद्याप भिनलं नाही त्यांच्यात.
त्यामुळेच असावं
सर्व नाग, धामण, फुरसे, मण्यार अजगरासारखे पडून आहेत.
कुठल्याशा ...

रेषेवरची अक्षरे बुधवार, २२ ऑक्टोबर २००८, १९:१९ (+०५:३०)

a Sane man Sane inSane

एक नवा उपक्रम...

... सोमवार, २० ऑक्टोबर २००८, १२:४७ (+०५:३०)

a Sane man Sane inSane

का नदीला ओढ नाही? ओघ का हा आटला?
पूर आहे सागराला, मेघ आहे फाटला

गंध होता जो उषेचा, चैत्ररातीचा सडा

कविता शुक्रवार, २२ ऑगस्ट २००८, १०:४१ (+०५:३०)

a Sane man Sane inSane

मेघनाकडून खो घेऊन...
------------------------------------------
१.

पाऊस अल्लद
स्वप्नातल्या हिनकळ्या सावलीसारखा.
दिवसाआधीच्या झांजरझापीतला.
झाडांच्या फांद्यांवर; थेंबथेंब पानांवर
अल्लद स्वप्नातला, पाऊस झोपेतला.

पाऊस पक्ष्यांच्या पंखांवर निसटता
हलका, हेलकावता, थेंबाथेंबीचा
पिवळ्या जर्द पहाटेच्या
अंगणात पाखडल्या चिमण्यांच्या
चिवचिव चोंचीतल्या गाण्यातला.

पाऊस चढतीचा

दिल में एक लहर सी... गुरुवार, ०७ ऑगस्ट २००८, ०७:०९ (+०५:३०)

a Sane man Sane inSane

नासीर काज़्मी यांची "दिल में एक लहर सी उठी है अभी" ही ग़ुलाम अलींच्या गायकीने अजरामर झालेली ग़ज़ल. तिच्या भाषांतराचा एक प्रयत्न.

मूळ ग़ज़लेचे देवनागरी transliteration (ह्याला मराठीत काय म्हणायचं? अक्षरांतर?)(संदर्भ):

दिल में एक लहर सी उठी है अभी
कोई ताज़ा हवा चली है अभी

शोर बरपा है ख़ाना-ए-दिल में
कोई दीवार सी गिरी है अभी

कुछ तो नाज़ुक मिज़ाज हैं हम भी
और यह चोट भी नई है अभी

वायफळ सूर सोमवार, २८ जुलै २००८, ११:१७ (+०५:३०)

a Sane man Sane inSane

वायफळ सूर (१)

वायफळ सूर (२)

वायफळ सूर (३)

काही निवांत क्षणांना हे जाणीव‍े-नेणीवेमधले वायफळ सूर कानांमध्ये रेंगाळतात. तसेच तेव्हाही रेंगाळत होते. घरपरतीच्या वाटेवरती. बँगा भरताना, पाऊस पाहताना, विमानात, धावपट्टीवर विमान उगीच रेंगाळत उभं असताना, विमानतळावर रिकामा बसलो असताना. सगळीकडेच. थेट शहरात पाय ठेवेपर्यंत नि त्यानंतर बरेच दिवस. अन्वयार्थांचे गुंते सोडवण्यात हशील ...