देवनागरी
Roman
Press F12 to toggle

रोजचच

सकाळ अंधारलेली .. सोमवार, २८ जुलै २००८, ०३:४१ (+०५:३०)

तुमचा आनंद माझी टवाळकी

वीजमहामंडळाच्या कृपेने आणि सद्या चालू असलेल्या,कधीही होणार्‍या भारनियमनामुळे सकाळी सकाळीच चाळीतली विज गेली. कसा बसा डोळे चोळत उठलो. तस डोळे चोळण्यात काही अर्थ नव्हताच म्हणा कारण पावसाळ्यात सकाळी ६ म्हणजे पाहिजे तसा उजेड नाही मग डोळे उघडुनही काही दिसणार डोम्बल.. कामाला वेळेवर निघायचे होते म्हणुन पटकन आवरत घेतल.

अंधारातच अंघोळ करण्याची मजा काय येते तुम्हाला काय सांगू. ...