देवनागरी
Roman
Press F12 to toggle

॥ उगाच उवाच ॥

ब्लॉग शिर्षक: ॥ उगाच उवाच ॥
अनुदिनीकार/प्रेषक: Ajit
ब्लॉग पत्ता: http://ugaach-uwaach.blogspot.com/
ब्लॉग वर्गीकरण:

मी... शेतकरी! बुधवार, ०३ डिसेंबर २००८, ०८:०७ (+०५:३०)

फार म्हणजे फार जुनी काही गोष्ट नाही. आठवी-नववीत असेन तेव्हाची. मोठेपणी तुला काय व्हायचे आहे इत्यादी प्रश्नांचा ब-यापैकी अर्थ कळतो असं ते वय असावं. अर्थात प्रश्नाचा फक्त अर्थच कळतो, नेमकं उत्तर मात्र ठाऊक नसतं असं ते वय (म्हणजे अजुनही सापडलंय की नाही ते माहित नाही, असो); पण मुद्दा तो नाही. त्यावेळी तो प्रश्न कुणी seriously विचारला असता, तर माझं उत्तर अगदी तयार होतं --- शेतकरी!
अगदी ...

अमेरीकेत गेल्यानंतर सगळ्यांत पहिली ... रविवार, १६ नोव्हेंबर २००८, १८:५१ (+०५:३०)

अमेरीकेत गेल्यानंतर सगळ्यांत पहिली गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे, कुठेही गेलं तरी आपण हॉलिवूडच्या चित्रपटात वावरतो आहोत असंच वाटतं. एकदा एका मित्राला हे बोलून दाखवलं तर तो म्हणाला, की "अरे त्यांच्या सिनेमांमधे इथे जसं आहे तसंच दाखवतात, त्यात काय एवढं!"
"त्यात काय एवढं॒? हं".
एकदा युटाहच्या ट्रिपला गेलो असतानाची गोष्ट: रात्रीचे साधारण अकरा वाजले होते ...

पुढील दोन उता-यांत तुम्हांला साम्य ... शनिवार, ०८ नोव्हेंबर २००८, ०६:५४ (+०५:३०)

पुढील दोन उता-यांत तुम्हांला साम्य दिसते आहे का? मला तरी तसे वाटते आहे. शेखर कपूरला कळवायला हवे! :)

बेघर अर्थव्यवस्था गुरुवार, १८ सप्टेंबर २००८, ०२:४४ (+०५:३०)

अमेरीकेची (आणि क्रमेणं जगाचीही?) आर्थिक घडी विस्कटण्यामागे अनिर्बंध-अमर्याद घरबांधणी हे मुख्य कारण असल्याचा निर्वाळा बुश प्रशासनाने दिल्याचं वाचलं. ही अशी घरघर लागलेली अर्थव्यवस्था कशी मार्गी लागणार अशा विचारात असताना, मला इतर भाषिक-सामाजिक गमतीदार प्रश्न समोर दिसू लागले आहेत---

  • अमेरीकेतली सामाजिक कारणांमुळे त्रस्त असलेली वृद्ध पिढी आता "कुणी घर घेता का घर?" असं ...

खादंती मंगळवार, २९ जुलै २००८, ०३:०५ (+०५:३०)

नुकताच एका ग्रीक रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. "बाबा गनूश" इत्यादी मेन्यूही छान होता वाचायला दिलेला. तिथे गेल्यावर "व्हॉट इज हॉट" असं विचारायची हुक्की झाली, पण बाहेरची हवा (आणि वेट्रेस!) सोडल्यास गरम म्हणावं असं काही तिथे दिसेना.

अचानक एक "भयंकर" कॅटेगरीतलं संगीत (!) सुरू झालं. मित्राला म्हणालो, "हे फारच झालं--- This music sounds totally Greek to me!"

त्यावरून काही खाद्य-विनोद सुचले. ते ऐकून 'पकला' नाहीत तर ...

उन्हाळ्याची सुट्टी शुक्रवार, २० जून २००८, ०८:४३ (+०५:३०)

झुकुझुकू अगीन गाडी धुरांच्या रेषा हवेत काढी
पळती झाडे पाहू या--- मामाच्या गावाला जाऊ या!आगीन गाडीनं मामाच्या गावाला जायचा योग आमच्या लहानपणी कधीच आला नाही (आणि भविष्यात तरी येणार की नाही कोण जाणे). नाशिक-पुणे हा उन्हाळ्यातला प्रवास आई आणि बहिणीबरोबर नेहमीच बसने व्हायचा. आख्खा रस्ता अतिशय रुक्ष, त्यामुळे पळती झाडे बिडे पाहण्याचा योगही नाही! उन्हाळ्याच्या सुट्टीतल्या ...

काय वाट्टेल ते होईल! रविवार, २७ एप्रिल २००८, ०५:२६ (+०५:३०)

काल की परवा IPL च्या मॅचनंतर पराभवाचं शल्य (टोचायला नको त्या ठिकाणी) टोचल्यामुळे रागाच्या भरात कर्णधार हरभजन सिंगने आपला हुकुमी गोलंदाज शांता श्रीशांतच्या श्रीमुखात भडकवली. चारचौघात आपल्या कर्णधाराने आपले गाल लाल चुटूक केल्याचं टिचभर दुःख अनावर झाल्याने श्रीशांतने टिव्हीवरच भोकाड पसरले.

या बातम्यांमध्ये ख-या बातमीपेक्षा त्या बातमीत वापरलेली मराठी जास्त मनोरंजक असते! ...

हसून हसून पुरेवाट होणे शुक्रवार, ०४ एप्रिल २००८, ०५:४२ (+०५:३०)

कधीतरी नकळत एखादा विनोद आठवून तुम्ही चार-चौघांत उगाचच हसलात आणि बाकिच्यांनी "काय आहे? काय झालं?" असं विचारल्यानंतर "काही नाही एक ज्योक आठवला" असं तुम्ही म्हणून गेल्यावर सगळ्यांनी नाक मुरडलं की त्यातच त्या विनोदाचं यश आलं. ("...चा पुतळा उगाचच ख्याक्क करून हसला तर कसं वाटेल" या वाक्याचं तसंच आहे; ते आठवलं की मला हसू येतंच)

खरा विनोद सांगणारा इसम जर स्वतःच हसू लागला तर त्या विनोदाची ...

कारणे दाखवा नोटीस गुरुवार, १४ फेब्रुवारी २००८, १३:३८ (+०५:३०)

आजचा दिवस "जागतिक हृदयरोग व हृदयविकार निर्मूलन दिवस" म्हणून का ...