देवनागरी
Roman
Press F12 to toggle

लहानपण देगा देवा

ब्लॉग शिर्षक: लहानपण देगा देवा
अनुदिनीकार/प्रेषक: धनंजय देव
ब्लॉग पत्ता: http://lahanpan.blogspot.com
ब्लॉग वर्गीकरण:

तो ( नास्तिक ?) शुक्रवार, १८ जुलै २००८, २३:५३ (+०५:३०)

तो

दिवाणखान्यात बसून
चारचौघांच्या संगतीत
मी जेव्हा तुझे अस्तित्व नाकारतो
तेव्हा आकाशाचे एक दार
किलकिले करून
तू पाहतोस माझ्याकडे कौतुकाने
कुतुहलानेही,
आणि सगळे निघून गेल्यावर
तार्याच्या अंधुक प्रकाशात
तू उतरतोस माझ्या एकांतात
आणि समोरच्य़ा ...

हाडांचे सापळे शुक्रवार, १८ जुलै २००८, २०:०७ (+०५:३०)

हाडांचे सापळे हासती
झडणार्या मासांस पाहुनी;
किती लपविले तरी
दातांचे दिसणारंच पाणी.

पहा विचारुनि त्यांना कसली
मैथुनात रे असते झिंग;
दाखवितिल ते भोक रिकामे
जिथे असावे मांसल लिंग.

पहा टाकुनी प्रश्न काय वा
निशाण तुमच्या हो बुद्धीचे;
घुमेल डमरुतुन ...

प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे शुक्रवार, १८ जुलै २००८, ०९:०२ (+०५:३०)

प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे |
तृषार्ताची तृष्णा मृगजळ पिऊनही वितळे ||
सशाला दिसे विपिन फिरता शृंगही जरी |
परंतु मूर्खाचे हृदय धरवेना क्षणभरी ||

जी.ए. कुलकर्णी यांच्या "माणसे: अरभाट आणि चिल्लर" ह्या आत्मवृत्तात ह्या रचनेबद्दल हा वेगळा उतारा वाचनात आला आणि प्रकर्षानी आठवण झाली ..

एकदा सडेकर मास्तरांनी निबंधाला विषय दिला : "प्रयत्ने वाळूचे कण रगडिता..." रात्री ...

आजीच्या जवळी घड्याळ कसले शुक्रवार, १७ ऑगस्ट २००७, १२:२७ (+०५:३०)


आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक,
देई ठेवुनि तें कुठे अजुनि हे नाही कुणा ठाउक;
त्याची टिक टिक चालते न कधिही, आहे मुके वाटते,
किल्ली देई न त्यास ती ...

निष्पर्ण तरूंची राई रविवार, ०४ मार्च २००७, २३:५७ (+०५:३०)

भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते
ते झरे चंद्रसजणांचे ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया
त्या वेली नाजुक भोळ्या वार्याला हसवुन पळती
क्षितिजांचे तोरण ...

रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा बुधवार, १८ ऑक्टोबर २००६, १३:२४ (+०५:३०)

रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा
विजयश्रीला श्री विष्णूंपरी भगवा झेंडा एकची हा || धृ. ||

शिवरायांच्या दृढ वज्राची ...

केसरी गुहेसमीप मत्त हत्ती चालला ... बुधवार, १८ ऑक्टोबर २००६, १३:२४ (+०५:३०)

दुंदुभी निनादल्या, नौबती कडाडल्या, दशदिशा थरारल्या,
केसरी गुहेसमीप मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला ||धृ.||

वाकुनी अदिलशहास कुर्निसात देवुनी,
प्रलयकाल तो प्रचंड खान निघे तेथुनी ,
हादरली धरणि व्योम शेषही शहारला ||१||

वेडात मराठे वीर दौडले सात मंगळवार, १७ ऑक्टोबर २००६, १२:५० (+०५:३०)

स्वराज्याचे सरनौबत प्रतापराव गुजर आणि महाराज यांच्यातील ऐतिहासिक सत्य प्रसंगावर आधारित कुसुमाग्रजांनी रचलेली ही कविता मंगेशकर कुटुंबियांनी स्वरबद्ध करुन अजरामर केली आहे.

कुसुमावली वर ही कविता ...

कुसुमाग्रजांच्या दोन कविता - झाड आणि मौन मंगळवार, १७ ऑक्टोबर २००६, ०२:५३ (+०५:३०)

पहिली कविता "मुक्तायन" कवितासंग्रहाच्या दुसर्या पानावर आहे, आणि दुसरी
चाळिसाव्या पानावर. दोन्ही तश्या वेगळ्या आहेत, पण तरी दोघींमधे एक विशेष
दुवा मला जाणवतो.

झाड

तूच पाऊस
तूच ऊन

मी फक्त एक झाड
आकाशात ...

रात्रीर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम् मंगळवार, १३ जून २००६, ११:५५ (+०५:३०)

रात्रीर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम् |
भास्वान् उद्देष्यति हसिष्यति पञ्कजश्रीः ||
इत्थं विचिन्त्य कोषगते द्विरेके |
हा हन्त हन्त नलिनीम् गजउज्जहार ||

रात्रीच्या वेळी कमलपुष्पे आपापल्या पाकळ्या मिटुन घेतात, जणु ...