देवनागरी
Roman
Press F12 to toggle

धन्यवाद

मराठी ब्लॉगविश्वाच्या सर्व व्यवस्थापकांना नमस्कार,
माझ्या नोंदी आता व्यवस्थित दिसू लागल्या आहेत. आपल्या तत्पर प्रतिसादांमुळेच हे शक्य झाले.
आपल्याला मनापासून धन्यवाद.

तरीही, हे नोंदवू इच्छितो, की ब्लॉग कसा जोडावा, नोंदी कशा दिसू शकतील याबाबतच्या मार्गदर्शनपर सूचना व्यवस्थित नव्हत्या. मला जे प्रश्न पडले होते ते अनेकांना पडले होते हे येथील नोंदींवरून स्पष्ट होते. त्यामुळेच, वारंवार आपल्याकडून मार्गदर्शन घ्यावे लागले.

असो. सूचना अद्ययावत कराव्यात, ही विनंती.

पुनश्च धन्यवाद.

सुचवणीबद्दल आभार

केदार,

तुम्ही सांगितल्यामुळे अगोदर येथे असणार्‍या लेखांमधील अपूरी माहिती आमच्या लक्षात आली. त्याबद्दल आपले आभार. तुम्हाला दिलेल्या उत्तरांवरूनच ही अधिक माहिती त्या लेखांमध्ये जोडली जाईल.

धन्यवाद,

सहाय्यक