हिरवी दुनिया
आमची बाग कशी आहे सध्या ?
मुख्या दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे लगेचच पारिजातक आहे. त्या शेजारी अनंताचे झाड आहे. त्या शेजारी फणसाचे. कोकणातला वृक्ष देशावर पाहिल्यावर अनेकांना नवल वाटते.
फणसानंतर ती बाजू संपते.
काटकोनात मोठे आंब्याचे झाड आहे. फणस व आंब्याच्या खूप मोठ्या सावल्या एकमेकांत मिसळून जाऊन एक मोठी सावली ...