देवनागरी
Roman
Press F12 to toggle

पुस्तकायन

ब्लॉग शिर्षक: पुस्तकायन
अनुदिनीकार/प्रेषक: अदिती
ब्लॉग पत्ता: http://pustakayan.blogspot.com
ब्लॉग वर्गीकरण:

रिबेका - अज्ञात भूतकाळाची भासमान सावली बुधवार, ११ जून २००८, २३:१४ (+०५:३०)

जागतिक वाङ्मयामध्ये आपल्या वैशिष्ठ्यपूर्ण रचनेने आपला असा वेगळा ठसा उमटवणारी काही पुस्तके आहेत. उदा. गॉन विथ द विंड, द अल्केमिस्ट आणि रिबेका. केवळ ही पुस्तके लोकप्रिय आहेत म्हणून ती वैशिष्ठ्यपूर्ण आहेत असे मात्र मला वाटत नाही. यातलं रिबेका मी अलिकडेच वाचलं. रिबेकाबद्दल थोडंसं लिहायचा मोह आवरणं अशक्य आहे. साधारण एकोणीसशे चाळीसच्या सुमाराला हे पुस्तक प्रकाशित झालं. ...

पोक्त बालपणाची अस्वस्थ करून सोडणारी कहाणी : शौझिया गुरुवार, २१ फेब्रुवारी २००८, २३:४१ (+०५:३०)

अफगाणिस्तान या एके काळी मुक्त असलेल्या आणि समृद्ध देशाची आज लक्तरं उरली आहेत. १९८८ साली रशियाच्या मदतीने बंडखोरांनी त्याच्यावर पहिला घाला घातला आणि त्यानंतर हा प्रांत अखंड धुमसतो आहे. 'तालिबान' च्या मूलतत्त्ववादी विचारसरणीने तर त्याला काहीशे वर्ष मागे नेऊन ठेवलं आहे.

गेली वीस वर्ष चाललेल्या या अराजकामध्ये अनेक उमलत्या वयाच्या मुलांचं बालपण अक्षरशः कोळशासारखं जळून ...

शतेषु जायते शूरः .....॥ बुधवार, ०५ डिसेंबर २००७, ००:२४ (+०५:३०)

निन्दन्तु नीतीनिपुणाः यदि वा स्तुवन्तु
लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेच्छम्।
अद्यैव मरणमस्तु युगान्तरे वा
न्यायात्पथः प्रविचलन्ति पदं न धीराः॥

असं नीतिशतकात म्हटलंय. मानवी गुणांमध्ये शौर्य या गुणाचे महत्त्व ...

द सीक्रेट ऍडव्हर्झरी मंगळवार, २३ ऑक्टोबर २००७, १८:१४ (+०५:३०)

ऍगाथा ख्रिस्तीच्या रहस्यकथा वाचताना आपण एका जागी खिळून असतो. एखाद्या नागराजाने आपल्या भक्ष्याला मोहिनी घातल्यावर ते भक्ष्य जसं भयचकित होऊन हालचाल करायचं देखिल विसरून जातं ना अगदी तशीच आपली अवस्था होते. पॉयरॉ श्रेष्ठ की होम्स ...

प्रायॉरी स्कूल (१) गुरुवार, १२ जुलै २००७, १३:३२ (+०५:३०)

शेरलॉक होम्सकडे अनेक अडचणीत सापडलेले लोक धाव घेत असत. त्यामुळे नाट्यमयतेचं आम्हाला वावडं नव्हतं.आमच्या बेकर स्ट्रीटवरच्या घराच्या बैठकीच्या खोलीत बसून आम्ही अनेक नाट्यमय प्रसंग पाहिले. पण मि. थॉर्नीक्राफ्ट हक्स्टेबल ...

प्रायॉरी स्कूल (२) गुरुवार, १२ जुलै २००७, १३:३२ (+०५:३०)

त्या दिवशी संध्याकाळी आम्ही मि. हक्स्टेबल यांच्या प्रसिद्ध शाळेत येऊन पोहोचलो. आम्ही पोहोचेपर्यंत चांगला अंधार पडला होता. तिथल्या बटलरने मालकाला पाहून एक कार्ड त्यांच्या हातात दिलं आणि त्यांच्या कानात तो काहीतरी कुजबुजला. ...

प्रायॉरी स्कूल (३) गुरुवार, १२ जुलै २००७, १३:३१ (+०५:३०)

दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठलो तेंव्हा नुकतंच फटफटू लागलं होतं. आणि होम्स पूर्णपणे तयार होऊन माझ्या पलंगाशेजारी उभा होता. आणि एव्हाना त्याची काही तपासणी करूनही झाली होती.
"गवताची आणि सायकल शेडची तपासणी मी उरकली आहे. रॅग्ड ...

प्रायॉरी स्कूल (४) गुरुवार, १२ जुलै २००७, १३:३० (+०५:३०)

आम्ही चेस्टरफिल्डकडे वळलो. जरा वेळाने आम्हाला फायटिंग कॉक नावाची सराई दिसली. ती इमारत जुनाट आणि भीतीदायक दिसत होती. तिच्या छपरावर एक मोठ्या कोंबड्याची आकृती बसवलेली होती. अचानक होम्सच्या तोंडून एक अस्फुट किंकाळी बाहेर पडली. ...

प्रायॉरी स्कूल (५) गुरुवार, १२ जुलै २००७, १३:२९ (+०५:३०)

दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता आम्ही होल्डरनेस हॉलजवळच्या यू ऍव्हेन्यूपाशी पोचलो. एलिझाबेथच्या काळातल्या एका मोठ्या दारातून आम्ही सरसाहेबांच्या अभ्यासिकेत गेलो. तिथे जेम्स विल्डरची आणि आमची भेट झाली. काल रात्रीच्या ...

तीन विद्यार्थी !!!(१) शुक्रवार, ०१ जून २००७, १२:१३ (+०५:३०)

१८९५ मधली गोष्ट आहे. होम्स एका प्रसिद्ध विश्वविद्यालयात काही चौकशीनिमित्त तळ ठोकून होता. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा या न्यायाने मीही त्याच्याबरोबर तिथे होतो. विश्वविद्यालयाचा नामोल्लेख टाळून या अतिशय रंगतदार केसबद्दल ...