देवनागरी
Roman
Press F12 to toggle

mazi saptahiki

ब्लॉग शिर्षक: mazi saptahiki
अनुदिनीकार/प्रेषक: S. P. DEO
ब्लॉग पत्ता: http://shankardeo.blogspot.com/
ब्लॉग वर्गीकरण:
Feed URLhttp://shankardeo.blogspot.com/feeds/pos ...
Last checked६ तास १२ मिनिटे अगोदर
Time until next refresh० सेकंद left

धोंडी धोंडी पाणी दे..! सोमवार, १४ मे २०१२, १०:२४ (+०५:३०)

‘माणसाचे पाऊल आणि वाळवंटाची चाहूल’ अशा अर्थाची एक इंग्रजीत म्हण आहे. त्याचा प्रत्यय महाराष्ट्रात सध्या जो दुष्काळ पडलेला आहे त्या घटनेने येत आहे. जागतिक विज्ञान आणि तंत्रज्ञान दिवस साजरा करताना प्रगत म्हणवणार्‍या महाराष्ट्रात अशी परिस्थिती निर्माण होते ही गोष्ट येथील प्रशासनाला शोभणारी नाही. इतर ग्रह गोलांवर पाणी आहे की नाही याचे पुरावे जगासमोर ठेवणारे प्रगत ...

बाळगंगेची आसवे.... रविवार, १३ मे २०१२, १७:१९ (+०५:३०)

माती कपाळी लाऊन मी वेशी बाहेर पडणार
माझा गाव पावसाळ्यात धरणाखाली बुडणार ll

घर तर कधीच मोडले गुरे ढोरे विकली
माणसे पांगली दूर दूर झाडे सारी सुकली
आठवणी काढीत माय अहोरात्र रडणार
गाव माझा पावसाळ्यात धरणाखाली बुडणार ll ll

धरण भिंत चढताना मन होते जळत
भिंतीत चिणणे काय असते आज होते कळत
धरणग्रस्त मोठी पदवी जीव पाण्यात सडणार
गाव माझा पावसाळ्यात धरणाखाली ...

वसुंधरेचे वस्त्रहरण रविवार, ०८ एप्रिल २०१२, १९:१५ (+०५:३०)

एकूणच निसर्ग आणि पर्यावरण याबाबत आपण किती जागरुक आहोत हे वेगळे सांगायची गरज नाही. मूळातच निसर्गाच्या संदर्भात राष्ट्रीय धोरण नेमके काय आहे याची नीटशी कल्पना नेते मंडळींना नाही. पण सरकारी धोरणे राबविणारी नोकरशाही व इतर संबंधीत यंत्रणा यांना तर नाहीच नाही. तसे असते तर लवासासारखा प्रकल्प निसर्गाच्या कुशीत उभाच राहीला नसता. सरकारच्या बेफिकीरीमुळे निसर्गाची जी ...

चिऊताई चिऊताई... मंगळवार, २० मार्च २०१२, ०९:१९ (+०५:३०)

चिऊताई सांग सांग तुला असे काय झालेसांग मला खरे एकदा तुझे घरटे कुणी नेले ll ll
वसंत येता आम्हा सारे कोकीळेचे गातो गाणेकुठे जातेस काय करतेस आम्हा नसे देणे घेणेआजच्या दिवशी कळे आम्हा तुझे घरटे आम्हीच नेलेचिऊताई सांग सांग तुला असे काय झाले ll ll
बॉम्बस्फोट खुनाखुनी मते द्या नी पैसे घ्याशहरातला गदारोळ बोंब मारुन भरपूर ...

साई - श्रद्धा और सबुरी गुरुवार, १५ मार्च २०१२, १०:२७ (+०५:३०)

कोणत्याही माणसाच्या आयुष्यात सुखाचे आणि दु:खाचे खेळ सुरुच असतात. माणसाच्या पडत्या काळात त्याचे मन अस्थिर बनते आणि मग आधारासाठी परमेश्वर किंवा गुरु यांच्या पायाशी त्याला जावे लागते. वाईट परिस्थितीमुळे हतबल झालेला माणूस कोणता ना कोणता आधार शोधत राहतो. कुणी गंडे, दोरे, ताईत बांधतो तर कुणी देवाला संताला साकडे घालतो. वाईट काळ आल्यामुळे अगतिक झालेला माणूस कोणत्याही थराला जातो. ...

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी.. शनिवार, ०३ मार्च २०१२, ११:२० (+०५:३०)

हल्ली जागतिक पातळीवर निरनिराळे दिवस साजरे केले जातात. या सर्व दिवसांना वेगवेगळे विषय नेमून दिलेले आहेत. बालक दिनापासून ते ज्येष्ठ नागरिक दिनापर्यंत तसेच आई वडिलांच्या दिनापासून ते डॉक्टर नर्स दिनापर्यंत सारेच दिवस आपण साजरे करत असतो. सध्या आपल्या देशात महिला वर्गाला सोनियाचे दिवस येत आहेत. त्यामुळेच पुढल्या आठवड्यात येणारा जागतिक महिला दिन आपण मोठ्या "ममतेने" साजरा करत ...

मराठी असे आमुची मायबोली... रविवार, २६ फेब्रुवारी २०१२, १०:४२ (+०५:३०)

काही वर्षापासून साहित्याच्या प्रत्येक व्यासपीठावरुन मराठी भाषेच्या दयनीय अवस्थेबद्दल गळे काढून रडण्याची जणू काही स्पर्धाच सुरु होती. आजही त्यात फारसा बदल झालेला नाही. एकूणच आपल्या मराठी या राजभाषेबद्दल फारसा विचार करायला कुणीही तयार नाही. दरवर्षी मराठी दिन साजरा केला की आपल्या राजभाषेबद्दलचे प्रेम व्यक्त झाले व आपली मायमराठीबद्दलची जबाबदारी संपली असे बर्याच जणांना ...

ओंगळ शहरे - भोंगळ कारभार मंगळवार, २१ फेब्रुवारी २०१२, १०:४७ (+०५:३०)

जिल्हा परिषद, पंचायत समिती या पाठोपाठ महाराष्ट्रातील दहा महानगरपालिकांच्या निवडणूकींचा एक महा ऊरुस संपला. वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने भरुन येणारे आरोप प्रत्यारोप यांचा शिमगा संपला. आता जिल्हा परिषद अध्यक्ष व महानगरपालिकांचे महापौर यांच्यासाठी मोर्चे बांधणी सुरु आहे. निवडणूक प्रचार काळात प्रत्येक शहराचे प्रश्न कोणते आहेत यावर प्रत्येक पक्षाने मतप्रदर्शन केले. पक्ष ...

साहित्यिक "वसंत" फुललाच नाही.... बुधवार, १५ फेब्रुवारी २०१२, १७:१० (+०५:३०)

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साहित्य संमेलन चंद्रपूर येथे साजरे झाले. मराठी साहित्याची परंपरा जपणारा हा उत्सव तसा आता साचेबंद बनत चालला आहे. आता या उत्सवाला साहित्य जत्रा म्हणावे की ऊरुस म्हणावे हा वादाचा मुद्दा आहे. पण एकूणच या संमेलनाचे स्वरुप पाहिले की मराठी भाषेच्या या महोत्सावाला गावागावात भरणार्‍या जत्रेचे स्वरुप आलेले आहे. याबाबत फारसे दुमत होणार नाही. प्रत्येक ...

लोकशाही व नेत्यांचा विजय असो... सोमवार, ०६ फेब्रुवारी २०१२, १६:०१ (+०५:३०)

आपली खूर्ची आणि सत्ता यापलिकडे राजकारण्यांचा डोक्यात दुसरा विचार नसतो. निवडणुका जवळ आल्या की, यांच्या अंगात वारं खेळू लागते. जणू काही निवडणूकांच्या तारखा केंव्हा जाहीर होतात याची नेते मंडळी वाटच पहात असतात. लोकशाही प्रक्रीयेतील निवडणूका हा एक अविभाज्य भाग आहे. त्याशिवाय लोकशाही या शब्दाला कोणताच अर्थ प्राप्त होत नाही. ग्रामपंचायतीपासून ते अगदी विधानसभा, लोकसभांच्या ...