देवनागरी
Roman
Press F12 to toggle

नभाचा किनारा

ब्लॉग शिर्षक: नभाचा किनारा
अनुदिनीकार/प्रेषक: Vishakha
ब्लॉग पत्ता: http://aavarta.blogspot.com/
ब्लॉग वर्गीकरण:
Feed URLhttp://aavarta.blogspot.com/feeds/posts/ ...
Last checked१७ तास ११ मिनिटे अगोदर
Time until next refresh० सेकंद left

हसत हसत! मंगळवार, ११ मार्च २०१४, २१:३८ (+०५:३०)

काल स्वप्नात आजी आली.
कोरडेच डोळे पुसल्यासारखे करीत,
म्हणाली,
"बाई गं श्वास धरून बस...
ही आयुष्याची छोटी छोटी ओझी...
पेलायची तुझी तुलाच.
मोठ्या दु:खांना मिळतील अश्रू
मिळतील सांत्वना, मिळतील ...

ती मुलगी... गुरुवार, २७ फेब्रुवारी २०१४, ०९:४२ (+०५:३०)

प्रिय, 

कुणालातरी कडकडून पत्र लिहावंसं वाटत होतं, म्हणून तुला लिहिते. तू टोटली नालायक आहेस, आणि मला गेल्या १० वर्षात एकदाही पत्र तर सोड, इमेलसुद्धा केलेली नाहीस, तरी लिहितेय, कारण... ...

तयाचा वेलू... सोमवार, २१ ऑक्टोबर २०१३, १९:२० (+०५:३०)

माझं बालपण गेलं, ते घर एका परीने अमेरिकनच म्हणायला हवं.
तिथे “दिसतं तसं नसतं” चे अमेरिकन नियम अगदी १००% लागू होते. अमेरिकेत कसं, driveway
मध्ये park करतात, नि parkway
वरती गाडी चालवतात. हायवेवरून ...

स्कार्लेट ओ’हारा सिनिकल का झाली नाही? मंगळवार, ०६ ऑगस्ट २०१३, ११:०३ (+०५:३०)

स्कार्लेट ओ’हारा चं झालं, तसंच आपलंही होईल असं कधी वाटलं नव्हतं. पण असं असूनही, आपण सिनिकल झालो. आपल्यात कडवटपणा आलाच. तिच्यात मात्र आला नाही. असं का?

स्कार्लेट बिचारी, तिला लहानपणापासून पढवून ...

छोट्यांचा देव शुक्रवार, २८ जून २०१३, ०७:२९ (+०५:३०)

प्रेमात, आणि आयुष्यात, कधीकधी छोट्या गोष्टींनी खूप फरक पडतो म्हणतात.
कोणीतरी एक छोटंसं स्वत:च्या बागेतलं म्हणून दिलेलं मोगऱ्याचं फूल.
अगदी आत्ता, ह्या क्षणाला  जोरात कुणाची आठवण आली असेल, आणि ...

पुस्तक वाचतांनाचा तू शुक्रवार, १७ मे २०१३, ०९:१० (+०५:३०)

पांढऱ्या शुभ्र मोकळ्या फुसफुशीत भातावर दाणेदार मुगाच्या दालफ्रायचा पिवळा रंग, आणि त्यावर खपून केलेली कुर्कुरीत हिरवी भेंडी वाढली, तरी तुझं लक्षच गेलेलं नव्हतं.
ते बघून माझा थोडा विरस झाला, पण छान ...

लेखनप्रपंच बुधवार, ०१ मे २०१३, ०८:०० (+०५:३०)

वाटे का लेखन। झाले आता बंद

डोके झाले मंद। कशापायी?

दिसामाजी काही । लिहीणे वाचणे
समर्थांचे सांगणे । नित्य असे

तेवढी चिकाटी । आणावी कुठून?
वृक्ष हा वठून । चाललासे

जालावर फार । लेखन ...

गाणाऱ्या कविता सोमवार, ०१ एप्रिल २०१३, ०८:०९ (+०५:३०)

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली

ती सर्व प्राप्त झाली, ह्या झोपडीत माझ्या॥

भूमीवरी निजावे, तारयांकडे पहावे

प्रभुनाम नित्य गावे ह्या झोपडीत माझ्या॥

ही संत तुकडोजी महाराजांची ओवी. ओवी ...

काही साक्षात्कार शनिवार, २३ मार्च २०१३, ०९:०२ (+०५:३०)

Epiphany!
कधीच्या काळी मी इंग्रजी साहित्य शिकत होते तेंव्हा James Joyce च्या पुस्तकातून परिचयाचा झालेला एक शब्द: epiphany म्हणजे साक्षात्कार. 

खरं म्हणजे रोजच आपल्या आयुष्यातल्या अनेक घटना आपण बघतो, ...

नामानिराळे! शुक्रवार, ०१ मार्च २०१३, ०९:४३ (+०५:३०)

दु:खाच्या आरशाने मला दाखवलं-
माझं जग
माझं स्थान
माझं उसनं अवसान.

प्रेमाच्या आरशाने मला दाखविले-
रंग पुसट-दाट
चढणीचा, पण हिरवा घाट
सदैव नव्यानेच वळणारी वाट.

काळाच्या आरशाने मला ...