देवनागरी
Roman
Press F12 to toggle

कर्‍हा ते मिसीसिपी

काहितरी .. शनिवार, १३ डिसेंबर २००८, ११:१४ (+०५:३०)

Somesh GuruVision

काही गोष्टी शब्दात लिहिता येत नाहीत, ‘कुण्या’साठी तरी वेडं होणं आणि ज्याच्यासाठी वेडं झालो आहोत त्याने ‘तू छान आहेस’ म्हणनं !

हे म्हणंनं अगदी email वर , phone वर किंवा डोळ्यातून ! या म्हणण्याला ‘इथल्या’ सांस्कृतिक वारश्याप्रमाणे Kiss नसेल किंवा xxx, पण ते तुमच्या अस्त्तित्त्वाचि साक्ष देतं. तुम्ही करताय ते योग्य करताय ...

एक नविन जगण मंगळवार, २८ ऑक्टोबर २००८, ०८:१८ (+०५:३०)

Somesh GuruVision

दिवाळीच्या दिवशी आपण Halloween Special - Horror movies बघत बसलेलो असतो.
ना फटाके, ना फराळं, ना सुगंधी तेल, ना उटणं ! इंडियन स्टोरमधून आणलेले काही स्वीटस्, चॉकलेट चिप्स कुकीज आणि कोक ! यावर हा दिवाळसण सुरू होतो. ‘आयुष्य’ पुन्हा एकदा त्रयस्थपणे आपल्याकडे पहात उभं असतं, काहीसं खिजवत ते पुन्हा पुन्हा ...

गांधी,फ्रॅन्कलिन आणि ssn शनिवार, १३ सप्टेंबर २००८, १६:१० (+०५:३०)

Somesh GuruVision

अमेरिकेत येऊन मला जवळजवळ महिना झाला असेल,
‘एका’ चाकावरचा जरी असला तरी वर्षभर राहण्यासाठी इथे संसारगाडा रेटावा लागणार आणि एका वर्षासाठी तरी इथे ‘ सोशलाईज’ व्हावं लागणार हे एव्हाना नक्की झालं. या सर्वांची सुरूवात झाली ती माझ्या इथल्या ‘ओळखी’पासून अर्थातच ‘सोशल सिक्युरिटी नंबर’ ! [ इथून पुढे ssn ]. हे प्रकरण तसं साधंचं असंल तरी ‘कर्‍हेकाठाहून’ निराळं असल्यामुळे यावर थोडं ...

कॉस्ट कटींग ! बुधवार, २७ ऑगस्ट २००८, १०:२१ (+०५:३०)

Somesh GuruVision

वेळ संध्याकाळी साडेसहाची. एका मित्राने जाता जाता अनाहूतपणे सल्ला दिला की आज मंगळवार आहे , तुला ‘ चिप डिल ‘ मधे केस कापून मिळतील.
गेली दिडमहिन्यापासून मी केस कापलेले नव्हते, मला केस कापायचेच होते म्हणून मी भल्या उत्साहात निघालो.’ चिप डिल’ पेक्षा मी आज पहिल्यांदाच अमेरिकेत केस कापतोय हाच उत्साह दांडगा होता. सांगितलेल्या दुकानासमोर व्यवस्थित जाऊन पोचलो.

मी केशकर्तनालयात ...

कर्‍हा ते मिसीसिपी 2 बुधवार, २३ जुलै २००८, ०९:२७ (+०५:३०)

Somesh GuruVision

जगण्याच्या ओघात काळ आपल्याला ‘कुठे’ नेऊन ठेवेल हे समजणं जसं कठीणच, तसंच आपलं पत्रावळं कुठे लागणार आहे अन् उष्ट कुठे सांडणार आहे हे सांगणंही कठीण !. कदाचित हे नियतीचं आपल्या हाताला धरून शिकवणं असेल किंवा शिक्षा सुद्धा,
कारण काही असो , निमित्त वेगवेगळी असू शकतात पण काळाच्या चित्रविचित्र पणातलं सातत्य मात्र अगदी तेच !

कधी श्रद्धास्थान बेळगाव असेल, कधी आसनगावचा योगा कॅंप ...

कर्‍हा ते मिसीसिपी 1 रविवार, २० जुलै २००८, ०२:४६ (+०५:३०)

Somesh GuruVision

जगाच्या दोन वेगवेगळ्या ‘टोकांवर’ जगण्याचे काय नियम असू शकतात हे सांगता येत नाही,
आता हेच पहा ना ..

भारतात रस्त्यावर धार मारू शकतो पण ‘किस्स’ मात्र करू शकत नाही ,
आणि इथे अमेरिकेत मात्र ...