देवनागरी
Roman
Press F12 to toggle

शुभांगी

ब्लॉग शिर्षक: शुभांगी
अनुदिनीकार/प्रेषक: Shubhangee
ब्लॉग पत्ता: http://sudhanshu-shubhangee.blogspot.com/
ब्लॉग वर्गीकरण:

पंढरीची वारी : एक अनुभव. बुधवार, २० ऑगस्ट २००८, १६:११ (+०५:३०)

लहानपणापासून पंढरीच्या वारीबद्दल ऎकून वाचून होते. शाळेत असताना पालखी बघायला गेलेलेही आठवतयं. वर्षांनुवर्षे लाखो वारकरी ऊन,पाऊस कशाकशाची पर्वा न करता दोन आडीचशे कीलोमीटरचे अंतर पायी कसे तुडवीतात? ते हि मोठ्या आनंदाने, ऒढीने! कुठलाही आर्थिक लाभ नाही, वैयक्तिक स्वार्थ नाही.नाना जातीचे, वेगवेगळ्या आर्थिक, सामाजिक स्तरातील हे वारकरी पंधरा दिवस एकत्र राहतात.स्वतःचा फायदा नसेल तर ...

नाट्यछटा शुक्रवार, २५ जुलै २००८, १५:०५ (+०५:३०)

मुलांना द्यायला आपल्याकडे वेळ नाही, हि आजच्या पिढीची व्यथा आहे घर,संसार आणि नोकरी अशी तारेवरची कसरत करणाऱ्या सगळ्याच कुटुंबाची हि कथा आहे.मुलांना तिसऱ्या वर्षापासून शाळेत घालतानाहि त्याचा तेवढाच वेळ बाहेर जाईल हा हेतू असतो. एकदा का मूल शाळेत जायला लागले कि अभ्यास त्याच्या मानगुटी बसतोच. वेगवेगळ्या अभ्यासाच्या आणि अभ्यासेतर स्पर्धा आणि त्या अनुशंगाने लागणारे मार्गदर्शन ...

चाळीशी: एक चिंतन गुरुवार, १७ जुलै २००८, १६:२४ (+०५:३०)

वर्तमानपत्रातील सुट्टीची पुरवणी वाचायला घेतली, त्यात ’चाळीशीच्या स्त्रियांसाठी मार्गदर्शनपर लेख’, तो वाचून बाजुला ठेवतीयं तोच ’स्त्रियांमधील चाळीशीनंतरच्या मानसिक स्थित्यंतरावरील’ खास अंकाचे साप्ताहिक नजरेस पड्ले. मुलीला घेऊन दवाखान्यात गेले तर तिथेही अशाच प्रकरच्या लेखांची मासिके,पाक्षिके.कावीळ झालेल्या माणसाला जग पिवळे दिसते तसे चाळीशीची चहूल लागताच मल जिकडे ...

विसंबणे : मंगळवार, १५ जुलै २००८, १०:४२ (+०५:३०)

माझ्या धाकट्या मुलीला धडा शिकवित होते. एका पक्षिणीची गोष्ट होती ती.एका शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावर या पक्षिणीचे घरटे होते.शेतातील पिकांचे नुकसान करणाऱ्या पक्षिणीचे घरटे ताबडतोब पाडून टाका, असा हुकूम शेतकऱ्याने त्याच्या नोकरांना दिला.पक्षिण त्यावेळी दाणे गोळा करयल गेली होती हा संवाद तिच्या पिल्लांनी ऎकला. पिल्ले बिचारी हवाल्दिल झाली. आई येताच त्यांनी सारी हकिगत तिला ...

शुभारंभ शुक्रवार, ११ जुलै २००८, १३:०६ (+०५:३०)

नमस्कार मराठी ब्लॉग पाहुन वाचून माझेही हात शिवशिवू लागले. आपणही केलेले काळ्यावर पांढरे येथे टाकावे. (विं.दां.ची क्षमा मागुन ’लिहिणाऱ्याने लिहित जावे वाचणाऱ्याने वाचित जावे वाचत वाचता एक दिवस लिहिणाऱ्याचे हात घ्यावेत') पंधरा सोळा वर्षांपूर्वीची गोष्ट.पुण्यात शाळांची संख्या मर्यादित होती. आजच्या सारख्य़ा international schools चे पेव फुटले नव्हते.त्यामुळे English Medium शाळांची चलती होती. आशा शाळेत ...