देवनागरी
Roman
Press F12 to toggle

vyutpatti

पोपटपंची - १ रविवार, १३ जुलै २००८, १९:०५ (+०५:३०)

शंतनु काव्य-शास्त्र-विनोद

पंतांच्या पगडीचे प्रवासवर्णन

परवा पुराण-प्रसिद्ध पखवाज पंडित पुरोहित पंतांची पिवळी पगडी पुरंदरच्या पंधराशेव्या पायरीवरून पुण्यात पर्वतीच्या पाचव्या पायरीपाशी पर्णकुटीपासून पंधरा पावलांवर पहुडलेल्या पंकजच्या पोटावर पटकन पडली. पगडी पडलेली पाहताच पंत पुरंदरच्या पायथ्याशी पोलिसठाण्यात पळाले. पुरंदरच्या पोलिसांनी पंतांना पुण्याच्या पोलिसांकडे पाठवले.