देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Kantala Nondwahi

अजून एक कन्टाळवाणी नोंद - Basically ऐकायचा कन्टाळा गुरुवार, १० जुलै २००८, ०८:०२ (+०५:३०)

Yawning Dog कंटाळा - kantala

एक प्रकारचा रागीट कंटाळा आला आहे आता !
Basically या शब्दाने प्रचंड उच्छाद मांडला आहे. १० पैकी कमीत कमी ७ सॉफ्टवेअर इंजिनियर तरी, दर ५ वाक्यांनंतर पुढचे वाक्य Basically ने सुरु करतात.
किती वर्षे सहन करावे माणसाने ? जवळ-जवळ Engg. F.E. पासून ते आजतागायत सहन करतोय मी हे ! ओरल मधे तेच, कांफ्रेंस कॉल मधे तेच, साध्या गप्पा मारताना सुधा Basically ? ऐकणारे सगळे कन्टाळले, वैतागले, पण हे बेसिक वीर काही दमत नाहीत! ...