देवनागरी
Roman
Press F12 to toggle

टॅलीनामा !

ब्लॉग शिर्षक: टॅलीनामा !
अनुदिनीकार/प्रेषक: असा हा एक(ची)नाथ !
ब्लॉग पत्ता: http://ejmarathe.blogspot.com/
ब्लॉग वर्गीकरण:
Feed URLhttp://ejmarathe.blogspot.com/feeds/post ...
Last checked१३ तास ४३ मिनिटे अगोदर
Time until next refresh० सेकंद left

ओवैसी फॅक्टर ! सोमवार, २० ऑक्टोबर २०१४, १६:०९ (+०५:३०)

या निवडणुकीत उघड चिथावणीखोर भाषणे करणार्या ओवैसी संघटनेचे 3 उमेदवार निवडून आल्याने अनेक जण अस्वस्थ आहेत. लोकशाही मार्गाने 3 उमेदवार निवडून आले हे खरे तर स्वागतार्हच आहे ! ही संघटना वाढली तर देशाच्या एकात्मतेला धोका आहेच. पण काळजी करायचे काहीही कारण नाही. देशात मुस्लिम 15 % असले तरी ते एकगट्ठा मतदान करतात हा सिद्धांत खोटा असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. मुस्लिम समाजात सुधारणेचा ...

25 वर्षानी मिळाला उ:शाप ! सोमवार, २० ऑक्टोबर २०१४, १२:४० (+०५:३०)

रामायणात एक गोष्ट आहे. सीतेच्या शोधासाठी हनुमान व इतर जणांचे पथक दक्षिण भारताच्या किनार्यावर पोचते. सीतेला इथूनच समुद्रपार लंकेत पळवून नेले आहे असे त्यांना जटायूचा भाऊ सांगतो व शापमुक्त होतो. पण एवढा मैलोनमैल पसरलेला समुद्र पार कोण करणार ? हनुमानाकडे ती क्षमता असते पण त्याला त्याची जाणीव नसते ! लहानपणी त्याने एका साधुची दाढी ओढलेली असते व तो त्याला सामर्थहिन होशील ...

लोकशाहीचा गाडा का अडला ? मतदार न फिरकल्... गुरुवार, ०९ ऑक्टोबर २०१४, १९:५७ (+०५:३०)

घोडा का अडला ? भाकरी का करपली ? पाणी का अडले ? या सगळ्यांचे उत्तर एकच आहे “न फिरवल्यामुळे” ! तसेच लोकशाहीचेही आहे ! लोकशाहीचा गाडा का अडला ? मतदार न फिरकल्यामुळे ! जिकडे लोकशाही रूळली आहे अशा देशात मतदानाचे प्रमाण 94 ते 98 % आहे व आपल्याकडे ते अजूनही 60 % च्या वर जात नाही ! आपल्या एका मताची किंमत मतदाराला अजूनही कळलेली नाही व ती कळावी या साठी प्रयत्नही करायची गरज सत्ताधार्यांना वाटत ...

या व्यंगचित्रात वावगे काय ? बुधवार, ०८ ऑक्टोबर २०१४, १९:४५ (+०५:३०)

गेले दोन दिवस टीके्ची झोड उठत असलेले व वंशवादी, भारतीयांची टींगल करणारे असा शिक्का बसलेले व्यंगचित्र मी अनेक कोनातुन पाहत आहे. यात आक्षेपार्ह काय आहे हे खरेच मला कळलेले नाही. उलट स्वत:ला "लय शहाणे" समजणार्या लोकांना शहाणपणाचे मार्मिक डोस यातून पाजले गेल आहेत. भारतीय पेहरावात भारतीय दाखविला तर तो अपमान कसा ? इंग्रजांच्या गुलामगिरीने आपण डोक्याचे सोडून कमरेला ...

कमळेच्या काडीमोडाची करूण कहाणी ! बुधवार, ०८ ऑक्टोबर २०१४, ११:०१ (+०५:३०)

कमळा ही एका मोठ्या घरातली एकुलती एक लेक होती. दिसायला चांगली, अभ्यासात हुषार, टाप-टीपीची आवड असलेली व गृहकर्तव्यदक्ष ! लग्नाच्या बाजारात ती सहज खपली असती पण तिच्या घरच्यांची भरमसाठ हुंडा द्यायची इच्छा नव्हती व ज्या घराण्यात मुलगी द्यायची ते घराणे श्रीमंत नसले तरी चालेल चारीत्र्यवान मात्र हवे, आपल्या विचारधारेचे नसले तर निदान तिला समांतर विचारधारेचे हवे असा आग्रह ...

रमेश किणीचे काय झाले ? मंगळवार, ०७ ऑक्टोबर २०१४, २०:१० (+०५:३०)

सामना सिनेमात मास्तर एकच प्रश्न विचारत असतात "मारूती कांबळेचे काय झाले ?" मला पण राजना एकच प्रश्न विचारायला आहे "रमेश किणीचे काय झाले" ?
शिवशाहीत एक सामान्य मराठी माणूस, सामना कार्यालयात शेवटचे बघितलेला , खिषात विष खायलाही पैसा नसलेला माणूस मुंबईतुन वादळी पावसात पुण्याला पोचला कसा, अलका सिनेमात, ब्रोकन अ‍ॅरो च्या शेवटच्या शोला गेला कसा, सोडीयम सायनाइड पिवून मेला कसा ...

नौटंकी साला ! मंगळवार, ०७ ऑक्टोबर २०१४, ११:०९ (+०५:३०)

सेनेला मुंढे प्रेमाचे भरते आलेले पाहून एकच डायलॉग आठवतो - नौटंकी साला !
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची आपली महत्वाकांशा मुंढेनी कधीच लपवून ठेवली नव्हती. तेवढी त्यांची पात्रता होतीच व आज जर युती असती तर भाजपाचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले असते हे सुद्धा नक्की ! मागच्या सलग 3 निवडणुका कमी जागा लढवूनही सेनेच्या जवळपास जागा ...

ब्लॉग पीडीएफ कींवा इ-बुक मध्ये कसा रूपा... सोमवार, ०६ ऑक्टोबर २०१४, १३:१६ (+०५:३०)

ब्लॉग नवीन लिहायला घेतला तेव्हा नुसता मोकाट सूटलो होतो. बरहा वापरून थेट ब्लॉगवरच पोस्ट करायचो. पोस्टस्‌नी पन्नाशी गाठल्यावर आपल्या ब्लॉगचे बॅक-अपच नाही हे लक्षात आले. ऑर्कुटवरील मित्रांनी मग एक सोप्पा उपाय तेव्हा सांगितला होता. ब्लॉगर सेटींग आवश्यकतेप्रमाणे बदलून आपल्या सगळ्या पोस्ट एकाच वेळी डिस्प्ले करायच्या व मग ब्राउजरमधला “सेव्ह अज” पर्याय ...

बाळासाहेबांच्या नावाने भावनिक साद घातली... रविवार, ०५ ऑक्टोबर २०१४, १६:०८ (+०५:३०)

छगन भुजबळ हे सेनेतुन बाहेर पडलेले पहिलेच बडे नेते. बाळासाहेबांनी तेव्हा खरोखरच भुजबळांना संपविले होते. माझगाव या त्यांच्या बालेकिल्ल्यात बाळा नांदगावकर या कार्यकर्त्याला उमेदवारी देवून भुजबळांना चीतपट केले होते सेनेने (आज नांदगावकर सुद्धा मनसेवासी झालेले आहेत !), मग भुजबळ नाशिकात गेले व लोकसभेला उभे राहिले व तिकडे सुद्धा त्यांचा पाडाव झाला !). मग मात्र भुजबळांनी आपले बळ ...

उद्धवा अजब तुझे वागणे ! शुक्रवार, २६ सप्टेंबर २०१४, १०:२४ (+०५:३०)

25 वर्षाची युती अखेर तुटली. ही युती 100 % सत्ता-प्राप्तीसाठी होती, तात्विक मुलामा कोणी कितीही देवो ! धाकल्या भावाचा उत्कर्ष सहन न झाल्याने मोठ्याने घर फोडले. या आधी मोठ्याच्या घराला घ्रर-घर लागलेलीच होती म्हणा, आधी राणे मग राज बाहेर पडलेच होते. राजने बाळासाहेबांचे नावही न घेता शिवसेनेच्या सत्ताकांशेला सुरूंग मागच्या निवडणुकित लावला होताच.
लोकसभेत नमो नामाने यश मिळाले ...