विठ्ठल...विठ्ठल...
सायंकाळी सात वाजताआज भल्या पहाटेच वारकऱ्यांनी पंढरीची वाट धरली. दोन दिवसांचा विसावा घेतल्यानं उल्हासित झालेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सहाला मार्गस्थ झाली. रथाच्या मागं आणि पुढं क्रमानुसार दिंड्या लागल्या. पुणे- सोलापूर महामार्गावर दुतर्फा भाविकांनी गर्दी केली होती. एकादशी असल्याने आज फराळाच्या पदार्थांचं ...