रात्रपाळी करून पहाटेच्या पहिल्या गाडीने घरी परतणाऱ्या मुंबईकरांना एक दृश्य नेहमी दिसतं. ठिकठिकाणी चहाचे स्टॉल्सवाले चहाचा पहिला ग्लास रस्त्यावर "अर्पण' करत असतात! त्यांच्या दिवसाची, धंद्याची ती सुरुवात असते, आणि मुंबईच्या खाद्ययात्रेचीही!
एव्हाना काही तुरळक उडीपी हॉटेलही उघडू लागलेली असतात. इतक्या पहाटेही त्यांच्याकडे "एकही प्लेट मे दो का मजा' देणारी "शिरा-उपमा प्लेट' ...