काय फायदा?
मेल्यानंतर कबर सजवुनि काय फायदा?
जिवंत असता मरण यातना
असले जगुनि काय फायदा?
जीवनी त्याची कदर नसता
सरणावरती फुले उधळुनि काय फायदा?
स्वप्न उद्याचे असे गुलाबी
आज वंचना काय फायदा
उपासमारी सदा सदाची
भूक सजवुनि काय फायदा?
प्रकाश क्षीरसागर