देवनागरी
Roman
Press F12 to toggle

माझी बडबड

ब्लॉग शिर्षक: माझी बडबड
अनुदिनीकार/प्रेषक: अदिती
ब्लॉग पत्ता: http://ovikavitaabhanga.blogspot.com
ब्लॉग वर्गीकरण:

या मातीतच विरून जावे॥ बुधवार, १२ डिसेंबर २००७, ११:३३ (+०५:३०)

पायाखाली काळी माती
त्यात रुजावी जीवनपाती ।
उमलुन यावे हिरवे जगणे
हिरवी बोटे हिरवी छाती॥

तापुन जावे, कधी निवावे
ऋतूऋतूचे गाणे गावे ।
थेंबाथेंबातून पुन्हा त्या
कुशीत काळ्या मिसळुन जावे॥

कळीकळीची ...

अघोर बुधवार, १२ डिसेंबर २००७, ११:३१ (+०५:३०)

मी उभी पाहते वाट
नदीचा घाट
सावल्या हलती
वाऱ्यात उडाला थवा
घुमे पारवा
डहाळीवरती ॥
किरणांचे वाळू घड्याळ
शांत आभाळ
विरागी वाणी
एकली नाव रांगते
जरा पांगते
निळेसे पाणी ॥
हा काळ न जाई पुढे
सारखा ...

बघ किती गंमत असते ! बुधवार, १२ डिसेंबर २००७, ११:२८ (+०५:३०)

काही न सांगण्यातही बघ किती गंमत असते
शब्दांचा हात सोडण्यातही बघ किती गंमत असते

पोटात खड्डे खड्डे पडतात, जाळ नुसता लागतो पेटू
दोन अश्रू पिण्यातही बघ किती गंमत असते

वाटेवर अंधारात काटे कुटे ...

कृपा तुझी रे अपार आहे बुधवार, १२ डिसेंबर २००७, ११:१९ (+०५:३०)

हिवाळ्यातली दुपार आहे,
निजावयाचा विचार आहे ...

शिरा करावा नव्या तुपाचा
'हिचा' मिळाला रुकार आहे

खुलून यावे कसे चवीने ?
घरात नुस्ती गवार आहे...

तळून काढा जरा करंज्या
मस्त मिळाला मटार आहे!

दिवास्वप्न हे लगेच ...

कधी ... बुधवार, १२ डिसेंबर २००७, ११:१८ (+०५:३०)

या तमातुनी मला दिसेल काजवा कधी?
हाय हात हा करी धरेल चांदवा कधी

तोलतो क्षणाक्षणास कारकून बैसला
दादरा कधी धमार मत्त केरवा कधी

कंस फार माजला दया करा प्रभू अता
ध्यास या धरेस उद्धरेल 'आठवा' कधी

साद ...

स्वप्नात रंग माझ्या कोणी भरून जाते..... बुधवार, १२ डिसेंबर २००७, ११:१७ (+०५:३०)

स्वप्नात रंग माझ्या कोणी भरून जाते
निद्रिस्त स्पंदनांना जागे करून जाते

आहे सदैव केला मी राग राग ज्याचा
ते दुःख का अताशा मज सावरून जाते

नाचे वसंत देही चाहूल ऐकता ती
येताच हाक कानी जग मोहरून जाते

एका ...

राप बुधवार, १२ डिसेंबर २००७, ११:१५ (+०५:३०)

आरसा मी एक आहे, ज्या स्वतःचे रूप नाही
बिंब उमटे लख्ख ज्याच्यावर कुणाची छाप नाही

पाहणारा पाहतो त्याच्या वसे जे अंतरंगी
लोचनांना भासणारा हाय माझा चाप नाही

या मनाने जाणलेली अंतरे अंकात यावी
एवढे हातात ...

सोहळा बुधवार, १२ डिसेंबर २००७, ११:१३ (+०५:३०)

दोन क्षणांचं अंतर
जाणिवांना समांतर
जीव लागता लागेना
आणि थांबेना नंतर

वाटा फुटतात जेंव्हा
होते एक वाट माझी
सोडलेल्या वाटेसाठी
तगमग का जिवाची?

झोपलेल्या पाण्यावर
बिंब नितळ पालथे
तरी अस्वस्थ कायसे

वर्तुळ बुधवार, १२ डिसेंबर २००७, ११:१० (+०५:३०)

नावडती कामे करता करता घुमती
या मनामधे किति आशावादी स्वगते
खंडकाव्य ओव्या अभंग कविता गाणी
मी मनात माझ्या बसल्या बसल्या लिहिते

मन म्हणते, मजला संधी दे गं थोडी
एक लेखणी, अशी रिकामी पाने
मग पाहशील तू ...

दिवाळी पहाट बुधवार, १२ डिसेंबर २००७, ११:०८ (+०५:३०)

आली पहाट हलके हसऱ्या धुक्याची
अंगी खट्याळ हसरा फुलवीत काटा
दारी दिव्यात उजळे हळुवार नक्षी
तेजाळ थेंब ढळती उजळीत वाटा

अंधार थंड बुजरा लपतोच कोठे
ज्योतीस वात धरता उचलून माथी
तेजात चूर अवघे जग रंगताना
झेपा अनार ...