रिमझिम, संततधार बरसणर्या पावसाकडे अनिमिष बघत राहते मग मी अशावेळी .
हा असाच आवडतो का आपल्याला?
का?
...की त्यादिवशी बेभान होऊन कोसळत राहणार्या त्याच्या अफाट आवेगाची भुरळ पडली होती?
तो चिंब, स्तब्ध वृक्ष आणि त्या खाली उभ्या आपण.
आपण कान्हाला भेटायला आसुसलेली राधा आहोत अणि हा पाऊस आपली वाट अडवून सामोरा आलाय...किती विनवण्या केल्या तरी त्याची अखंड, अभेद्य भिंत खोलायला तो ...