माझा ब्लॊग
"अविनाश, जरा कपाटावरची सूटकेस काढून तिची चेन रीपेअर करून आण बरं!" कुटुंबाचे फ़र्मान सुटले आणि मी ओळखले की यंदा कोकणात जायचे नक्की झाले. कुटुंबाच्या मनात काय आहे ते असे आडवळणानेच ओळखावे लागते.
तसे लग्न झाल्यावर दोन तीनदा आम्ही कोकणात गेलो होतो. पण ते फ़क्त दापोलीला जाउन तिथे तीन चार दिवस राहून परत. (दापोली हे कुटुंबाचे गाव.) ह्या वर्षी मात्र तसे न करता कोकणात जमेल तितकी भटकंती ...