पूर्वप्रसिद्धी: मनोगत दिवाळी अंक २००८
'अनिवासी (पण) भारतीय' म्हणुनी दुखर्या किती ओळखी
डॉलरने भरले खिसे पण मने प्रेमास का पारखी?
आहे जे विसरायचे ठरवले, करतो उजळणी जरा
(विस्मरणे नव्हती कधीच कुठली सोपी, मनासारखी)
आषाढा, बघतोस ...
पूर्वप्रसिद्धी: मनोगत दिवाळी अंक २००८
'अनिवासी (पण) भारतीय' म्हणुनी दुखर्या किती ओळखी
डॉलरने भरले खिसे पण मने प्रेमास का पारखी?
आहे जे विसरायचे ठरवले, करतो उजळणी जरा
(विस्मरणे नव्हती कधीच कुठली सोपी, मनासारखी)
आषाढा, बघतोस ...
*****************************************
ठाऊक होतं येईल पत्र तुझं फक्त आजच
त्यातल्या संवादानंतर चालू होणार माझं आत्मवृत्त
इतकी कशी ही शांतता बोलभांड?!
आलेत एकाच दिवशी पूर
चांदण्यावरच्या कवितांचे
चंद्र,भरती नि शब्द - भलतेच
गेलेत वरती म्हणायचे!
कोजागिरीला हवा कशाला
बिलियन्स् चा बेल्-आउट्?
******************
मिळतील तितके चंद्र घालून
बांधल्या असत्या कित्येक भेळी
भरतीपण मग आली असती
सुमेधाने साखळी हायकू साठी खो दिल्यानंतर केलेले वाचन आणि लेखन यातून सुचलेली एक त्रिवेणी -
वाचून ...
मागच्या आठवड्यात संवेदनी काव्यमय खो खो सुरु केला. सागरनी सुमेधाच्या कवितेवर कवितारुपी प्रतिक्रिया धाडली आणि या सगळ्यातून साखळी हायकूची कल्पना तिला सुचली.
तर नियम :
१) खाली मी लिहिलेल्या हायकू प्रमाणे दोनच ओळींचा (की ओळींची?) हायकू रचायचा.
२) त्यातील मात्रा, ताल, ध्वनीरुप तसंच्या तसं आलं तर उत्तम, शक्य तितकं साम्य राखायचा प्रयत्न करायचा. मात्र मी माझा हायकू तीन ओळींचा ...
आरंभ: १४/०२/२००९ - ०९:००
समाप्ती: १६/०२/२००९ - २२:००
ठिकाण: सॅन होजे, कॅलिफोर्निया
माहितीचा स्रोत: मी स्वतः
सॅन फ्रान्सिस्को बे एरिया या आंतरजालाच्या उगमस्थानी होणाऱ्या पहिल्यावहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनात "काहीतरी वेगळे" स्वरूपाचा एखादा मराठमोळा कार्यक्रम आणि त्यानिमित्ताने आंतरजालीय साहित्याशी रसिकांची ओळख करून देणे या हेतूने ...
तिन्ही त्रिकाळ
संध्याकाळ
नेहमीच ... तुझ्यामुळे
मेंदूतले घोळ
पांजरपोळ
नेहमीच ... तुझ्यामुळे
ओठांत धूर
डोळ्यांत पूर
नेहमीच ... तुझ्यामुळे
ओले घसे
(होते हसे!)
नेहमीच ... तुझ्यामुळे
मेक-अप् च्या अडगळलेल्या डब्यात....
लिप् स्टिक् चा बोटभर तुकडा शोधून,
ओठांशी मस्ती करणार्या आरशामधल्या
पाचफुटी फुला....
उगीच का अत्तर लावतोस?
तुझ्या या मोरपिशी साडीनंच
"अत्तर शिंपडलंय या देखाव्यात''
निर्या घट्ट धरून ठेवणारी तुझी बोटं...
आणि ...
आपण सगळेच बैल असतो
बायको लटके रागवत असते आणि आपण घाबरत असतो
फक्त दोनवेळा जेवण आणि फोमच्या डबलबेडवर खूश असतो
बायकोच्या एखाद्या इशार्या सरशी ऊर फुटेतोवर धावत असतो.
आपण सगळेच बैल असतो
बायकोने यावे आपल्या गळ्यावरची दाढी खाजवावी
अंघोळीला आपली पाठ चोळावी
कधी तरी पुरणपोळी चारावी म्हणुन वाटपहात असतो
आपण सगळेच बैल असतो