माझ्या ब्लॉगवर पोस्ट पब्लिश झाल्यावर तो,
कोणत्या दिवशी पब्लिश झाला....
त्या दिवसाची तारिख काय
त्या दिवसाची वेळ काय
ही माहिती माझ्या ब्लॉगच्या मुख्य पानावर येते तसंच
ह्याची माहिती आपल्या "मराठी ब्लॉग विश्वावर" मुख्य पानावर त्या पोस्टच्या शिर्षकाजवळ दिसते.
उदा.
“इलो रे,इलो!” कोकणातला पाऊस.
सोमवार, ०९ जून २००८, ११:२९ (-०८:००) कृष्ण उवाच
तेव्हा हा वार,तारिख,वेळ आणि कंसातली माहिती
(-०८:००) काय?
हे सर्व कोणत्या देशाशी संबंधीत आहे.?
असं कुतुहल वाटतं.
ह्या प्रश्नाचं कारण असं,
मी माझ्या ब्लॉगवर अमेरिकेहून माझा पोस्ट wordpress.com वर पब्लिश केल्यावर माझ्या मुख्य पानावर तारिख आली
June 9 2008,12.29 pm
ही पॅसिफीक वेळ आहे.आणि ती अमेरिकेतली आहे.
त्यावेळी India तली वेळ
June 10 2008, 12.59 am
अशी असावी तर मग
सोमवार, ०९ जून २००८, ११:२९ (-०८:००)
ही तारिख "मराठी ब्लॉग विश्वावर" काय सांगते?
एव्हडीच कुतुहलामुळे पृच्छा आहे.
आपल्या सवडीनुसार माहिती दिल्यास बरं वाटेल.
सामंत
shrikrishasamant.wordpress.com "कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
वेळेचा अर्थ आहे U.S.T +/ ( XX.XX )
तुम्हाला दिसत असलेली कंसातील (-०८:००) ही वेळ म्हणजे U.S.T (Universal Standard Time/Greenwich Time) -०८:००. म्हणजे प्रकाशनाची वेळ तुमच्या स्थानिक वेळेनुसार (Pacific Standard Time) दिसते.
जर तुम्ही भारतातून ह्या संकेतस्थळाला भेट द्याल तर प्रकाशन झाले तेव्हाची भारतातील वेळ दाखविल्या जाते व कंसात (+५:३०) असा भारतीय प्रमाणवेळेचा U.S.T. शी असलेला फरक दाखविला जातो.
आपल्या प्रश्नाबद्दल आभारी आहे. कदाचित बर्याच मराठी ब्लॉग विश्वाच्या वाचकांना हा प्रश्न पडलेला असेल.
- सहाय्यक
कुतुहलामुळे पृच्छा
नमस्कार,
आपल्या स्पष्टीकरणा बद्दल आभार
सामंत