देवनागरी
Roman
Press F12 to toggle

भडकमकर मास्तर

ब्लॉग शिर्षक: भडकमकर मास्तर
अनुदिनीकार/प्रेषक: भडकमकर मास्तर
ब्लॉग पत्ता: http://bhadkamkar.blogspot.com/
ब्लॉग वर्गीकरण:

ऒलिम्पिक आणि भारत : अपेक्षा क्षमता आणि तारतम्य... शनिवार, ०२ ऑगस्ट २००८, ००:५६ (+०५:३०)

ऒलिंपिक जवळ आलं की वर्तमानपत्रांतून आणि टी व्ही वरून एक विचित्र प्रकारचं मार्केटिंग सुरू होतं, अपेक्षा वाढवणारं बाजारीकरण..आपल्या संघाच्या खेळाडूंना शुभेच्छा देणं, त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करणं मी समजू शकतो, पण पदकांची अपेक्षा / पदकांची अपेक्षा असं किती म्हणत राहणार ? ( चांगली कामगिरी करणं म्हणजे केवळ सुवर्णपदक आणि सुवर्णपदकच मिळवणं असे नव्हे हे ...

"अब और कितना गिरना बाकी है "? शनिवार, ०२ ऑगस्ट २००८, ००:४८ (+०५:३०)

accredited online degrees
२००५ मध्ये "मातृभूमी ए नेशन विदाउट विमेन" नावाचा सिनेमा पाहिला..बरीच परीक्षणं वाचलेली होती,गोष्ट माहित होती, आपण एक सामाजिक आशय असलेला सिनेमा पाहून संदेश वगैरे घेऊन प्रसन्न मनाने बाहेर पडणार इतकी बाळबोध अपेक्षा नव्हती तरी सिनेमा इतका त्रास देऊ शकेल असंही वाटलं नव्हतं... लिंगभेद, स्त्रीभ्रूणहत्या, जातिभेद यांचं इतकं भडक भयानक रूप पाहताना कोणीतरी ...

माझं आवडतं नाटक : फ़ायनल ड्राफ़्ट शनिवार, ०२ ऑगस्ट २००८, ००:४४ (+०५:३०)

नाटक : फ़ायनल ड्राफ़्ट
लेखक आणि दिग्दर्शक : गिरीश जोशी
कलाकार : मुक्ता बर्वे
गिरीश जोशी
निर्मिती : महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे

जसे नाट्यलेखनाच्या मूलभूत नियमांबद्दल लिहिले, तसेच लेखनाच्या ठराविक आडाख्यांपासून दूर जाणारे, नियमांच्या साचेबद्ध चौकटी तोडणारे नाट्यलेखन यावरही लिहित आहेच..... चाहूल, साठेचं काय करायचं, लूज कंट्रोल यावर पूर्वी लिहिलं आहेच... तसंच ...

माझा आवडता सिनेमा दामिनी (१९९३) मंगळवार, ०८ जुलै २००८, ००:३९ (+०५:३०)

दामिनी...

कथासार : दामिनी (मीनाक्षी शेषाद्री) या गरीब मुलीचे ऋषी कपूरच्या श्रीमंत घरात लग्न होते, तिथल्या तरूण मोलकरणीवरती बलात्कार करताना आपल्या दिराला आणि त्याच्या काही मित्रांना दामिनी पाहते आणि कोर्टात सत्य बोलून गुन्हेगारांविरुद्ध साक्ष देते,( यात ती तिचा पती आणि सासरच्यांचा रोष ओढवून घेते) मात्र तिला कोर्टात वेडं ठरवलं जातं, घरातून हाकलून वेड्यांच्या इस्पितळात ...

एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) : संघर्ष मंगळवार, ०८ जुलै २००८, ००:२७ (+०५:३०)

आता एक गोष्ट बघू...
एक मुलगा सकाळी उठून शाळेत जातो , त्याचा रिझल्ट कळतो, त्याला शाळेत पहिला आल्याबद्दल बक्षीस मिळतं आणि तो आनंदानं घरी येतो.

ओके..गोष्ट बरी आहे, पण मला त्यातून का मजा येत नाही?
त्यात अजिबात संघर्ष नाही...
शाळेत पहिला आला नाही तर काय होईल ते कळत नाही...
व्हॉट इज ऍट स्टेक? काय पणाला लागलंय?

एका दुसर्‍या मुलाने खूप स्पर्धा निर्माण केली आहे आणि पहिला नंबर ...

ऍरिस्टॉटलचे ड्रामॆटिक ... मंगळवार, ०८ जुलै २००८, ००:२२ (+०५:३०)


ऍरिस्टॉटलचे ड्रामॆटिक स्ट्रक्चर

सुरुवात : यात पहिल्या १० % भागात स्थल,काल,व्यक्ती यांच्याबद्दल माहिती देणारे प्रसंग घडतात.
मध्य : पुढच्या ७५ % भागात नाट्यमय ताण वाढत जातो आणि आणीबाणीच्या परिस्थितीत अत्युच्च ताणापाशी क्लायमॆक्स, इथून माघार अशक्य.
शेवट : आणि मग उरलेल्या १५ % भागात ताणाचे निराकरण आणि तात्पर्य समजते.
____________________________________________

व्यक्तिरेखन

एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) मंगळवार, ०८ जुलै २००८, ००:१५ (+०५:३०)

" नाट्यलेखन काय क्लासमध्ये शिकवून येतं का रे? "
" काय एवढं शिकवतात रे लेखन कार्यशाळेत? "
अशा काही सीनियर नाटकवाल्याच्या प्रश्नांना तोंड देत देत आम्ही एक दोन लेखन कार्यशाळांमध्ये जाऊन शिकून वगैरे आलो... मग तिथून प्रेरणा घेत घेत आंतरजालावरती बरंच लेखनतंत्राविषयी वाचलं... पटकथा लेखन शिक्षण आणि नाट्यलेखन शिक्षण या विषयावर आंतरजालावरती प्रचंड साहित्य उपलब्ध आहे, त्यातलं काही ...

लूज कंट्रोल...दीर्घांक ... एक परीक्षण / अनुभव रविवार, २२ जून २००८, ००:३८ (+०५:३०)

लूज कंट्रोल...

२००५ च्या सुदर्शन रंगमंचावर महाराष्ट्र कल्चरल सेंटर आयोजित दीर्घांक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणारं नाटक..

लेखक : हेमंत ढोमे
दिग्दर्शक : निपुण धर्माधिकारी
कलाकार : अमेय वाघ,हेमंत ढोमे,निपुण धर्माधिकारी, सुषमा देशपांडे
निर्मिती : समन्वय पुणे.

या नाटकाचा दीर्घांक मी जुलै २००६ मध्ये पाहिला. त्याचे नंतर दोन अंकी नाटक आले, पण ते जास्त काळ टिकले नाही. ते ...

कुत्रा आणि मी ... काही अनुभव... रविवार, २२ जून २००८, ००:३३ (+०५:३०)

".... कुत्रा घराची आणि शेताची राखण करतो.प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून धन्याचे प्राण वाचवतो, असा हा इमानी प्राणी मला खूप आवडतो...." वगैरे वगैरे वगैरे.. हे असलं मी शाळेतल्या निबंधात अनेक वेळा लिहिलं आहे , यातला बराचसा भाग खरा असला तरी कुत्रा प्राण्याचं ते फ़ार एकांगी आणि फ़िल्मी वर्णन असतं... आता मी जे पुढं लिहिलंय त्या आहेत निबंधात न लिहिता येण्यासारख्या गोष्टी..

काही मंडळींना ...

पुस्तकाची ओळख... "असे पेशंट , अशी प्रॅक्टीस...".. लेखक : डॉ : प्रफुल्ल दाढे रविवार, १५ जून २००८, २३:०७ (+०५:३०)

पुस्तकाचे नाव... : असे पेशंट, अशी प्रॅक्टिस आणि ऍलर्जी एक इष्टापत्ती
प्रकाशक : अक्षयविद्या प्रकाशन
पृष्ठे : १६०
मूल्य : १२५ रु.
लेखक डॉ : प्रफुल्ल दाढे

लेखक एम.बी.बी.एस. आहेत ...ते अडतीस वर्षे वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित असून त्यांनी दोन वर्षे सरकारी नोकरी केली आणि नंतर स्वतंत्र व्यवसाय चालू केला.
हे पुस्तक म्हणजे व्यवसाय करताना डॉक्टरांना आलेल्या पेशंटची ...