मनात राहिलं मन एक!!!
त्या गडगडाटात टाळ्यांच्या
माझी डळमळीत टाळी ही
तीचा आवाज मी आणि आसपास
कुणीही ऎकला नाही
या न थांबणारया वेळेनं
मला अनंत संधी दिली
कधी विचार मी केला नाही
कधी कॄती ती झाली नाही
अजून आवलोकन करतोय ...