बरेच दिवस तीची आणि माझी गाठभेट झाली नव्हती. तीचे आणि माझे नाते तसे थोडे वेगळेच आणि एकतर्फी. मला तीचे नावगाव काही म्हणजे काही माहिती नाही आणि माझी खात्री आहे की तीलाही माझ्याबद्दल काहीच माहित नाही. एकाच रस्त्यावर चालत असतांना एकमेकांच्या समोरुन जाणे, ही आमची भेटीची तर्हा. अर्थात असे बर्याच लोकांबरोबर होत असावे, मग यात विशेष असे ते काय? विशेष म्हणजे तीचे ते 'Hi' म्हणतांनाचे गोड ...