देवनागरी
Roman
Press F12 to toggle

गेले दोन दिवस माझे post आपल्या site वर येत नाहीत.

नमस्कार,
३ जून २००८ ला माझा पोस्ट "ईलो रे ईलो! कोकणातला पाऊस "ह्या मथळ्याचा लेख आणि ४ जूनला "कळत नकळत फसलो तुझ्या स्तुतिला" ह्या मथळ्याची कविता आपल्या साईटवर आली नाही.
बहुदा काही गडबडा असावी.
पोस्ट पबलीश केल्यावर माझ्या "कृष्ण उवाच" पानावर आपला "मराठी ब्लॉग विश्व " च्या icon वर दुवा जुळल्याची नोंद येते. गेले दोन दिवस ती येत नाही हे माझे ऑबझरवेशन आहे.
त्याशिवाय आपल्या सुचने नुसार मी पर्मलिंकवर ही click करीत असतो.
नेहमी प्रमाणे आता पर्यंत विना अडचण पोस्ट येत तसं सध्या होत नाही
कृपया मदत करावी
ह्याचा रिसपॉन्स पण द्यावा.
माझा url
shrikrishnasamant.wordpress.com
आणि
होम पेज
"कृष्ण उवाच"
असे आहे
ईमेल shrikrishnas@gmail.com
हे जादा माहिती साठी देत आहे
सामंत

चौकशी सुरु आहे

सामंत,

तुमच्या ब्लॉगबद्दल चौकशी सुरु आहे.

- सहाय्यक.

नविन पोस्ट दिसत नहि

ही प्रतिक्रिया येथे हलविण्यात आली आहे.

माझे पोस्ट आपल्या साईट वर येत नाहीत

आपण लक्ष घालत आहात हे वाचून आनंद झाला.
good luck
सामंत

माझे पोस्ट आपल्या साईट वर येत नाहीत

आपण "माझा ब्लॉग आपल्या साईटवर येत नसल्याच्या"
कारणाचा शहानिशा करीत आहात असं मला "माझ्या
ह्या अडचणिच्या" प्रश्नाला उत्तर दिलं असल्याने मला
आपल्याला त्यावर लक्ष द्यायला सवड देणं क्रमप्राप्त
आहे.
पण मध्यंतरी आपण सुचविल्या प्रमाणे माझ्याकडून
होत असलेल्या प्रयत्नाची आपल्याला माहिती देवून
update करणं योग्य ठरेल अशा विचाराने खालिल
मजकूर आपल्या समोर ठेवणं हाच केवळ उद्देश
आहे,असं कृपया लक्षात घ्यावं ही विनंती.
आपल्या सुचने प्रमाणे
http://feeds.feedburner.com/krishnaoovaach
असा मी feedburner माझ्या
wordpress.com च्या ब्लॉगच्या सहाय्याने
तयार करून माझ्या साईटच्या मुख्य पानावर त्याचा
chiklet icon , sidebar वर नोंदला आहे.
मध्यंतरी माझ्या सारख्याच इतरांची "ब्लॉग दिसत
नाही "अश्या अडचणीची चर्चा वाचून आपण त्याना जे
http://marathiblogs.net/node/20709
http://marathiblogs.net/node/15559
http://marathiblogs.net/node/14553
ते "जोडून " मग "जोडले" असं लिहून पाठवू
शकल्याने त्यांची अडचणी दूर झाल्या असाव्यात असं
मला वाटतं.हा असाच मला "node" मिळ्याल्यास
माझा ही ब्लॉग जोडता येईल का? असं माझ्या मनात
आलं.
असं समजणं कदाचित माझ्याकडून चुकतही असेल.
तर ही शक्यता माझ्या बाबतीत कठीण का असावी
ह्याचं कुतुहल वाटून आपल्याला लिहीत आहे एव्हडंच.
नाहिपेक्षा आपली साईट वगळल्यास माझा ब्लॉग इतर
blog aggregator वर विनासायास जात आहे.
एव्हड्यात मी पाच सात नवे posts publish केले आहेत.
सामंत.
"कृष्ण उवाच"

चौकशी सुरु आहे

सामंत,

"ब्लॉग दिसत नाही " असे म्हणणारे सदस्य नुकतेच त्यांचा सुरु झालेला ब्लॉग "मराठी ब्लॉग विश्वावर" नोंद करण्यासाठी शंका प्रकट करतात. त्यानंतर त्यांना दिलेल्या प्रतिसादांमध्ये "http://marathiblogs.net/node/207" अशा प्रकारचा मजकूर त्यांच्या जोडलेल्या ब्लॉगची शहानिशा करण्यासाठी त्यांना पाठवला जातो.

तुमचा ब्लॉग http://marathiblogs.net/node/39 येथे अगोदरच जोडण्यात आला आहे. परंतु त्यावरील फीड काही कारणानी नवीन नोंदींची दखल घेण्यास असमर्थ ठरत आहे. काही वर्डप्रेसवरील ब्लॉगांवरच ही अडचण येत आहे. ह्यातील मुख्य दोष शोधून काढण्यास कार्य सुरु आहे. ही अडचण मात्र दूर होण्यास कदाचित आणखी काही दिवस लागू शकतील.

कळावे,
सहाय्यक

दोष दुरुस्त

काही तपासानंतर आम्हाला असे आढळून आले की wordpress.com वरील मुख्य फीड मराठी ब्लॉग विश्वाशी बरोबर काम करत नाही. आम्ही सगळ्या वर्डप्रेसवरील फीड्स ATOM Format मध्ये परिवर्तीत केल्या आहेत. त्यामुळे wordpress.com वरील सगळ्या ब्लॉगांची नवीन नोंदी न दिसण्याचा दोष दुरुस्त झाला आहे.

पुन्हा अडचण आल्यास कळवावे,

सहाय्यक

खूप खूप धन्यवाद

नमस्कार,
आपले धन्यवाद मानावे तेव्हडे थोडेच.
आज पाच दिवसा नंतर आपल्या साईटवर मी माझा पोस्ट पाहू शकलो.आपल्या साईट वरून मला खूप वाचक मिळतात.ते पाहून मला आनंद होतोच शिवाय आणखी लिहिण्यास हूरूप पण येतो.त्यामुळे मला आनंद झाला.
आपण पण चिकाटी ठेवून हा प्रॉबलेम सोडवल्या बद्दल पुन्हा आपले आणि आपल्या टीमचे धन्यवाद.

आता आणखी एक प्रश्न आपल्याला विचारावासा वाटतो.तो असा...
ह्या अडचणीच्या मधल्या period मधे माझे एकूण आठ पोस्ट आपल्या साईट्वर आलेले नाहित तेव्हा ते बऱ्याच वाचकाना miss झाले असणार तर ते आपल्या मुख्य पानावर कसे आणावे?एक एक करून किंवा सगळे मिळून? की तसं करताच येणार नाही.?त्याचं मार्गदर्शन केल्यास आभार.
सामंत

क्रमवारी पोस्टच्या प्रकाशन दिनांकेवर ठरते

क्रमवारी पोस्टच्या प्रकाशन दिनांकेवर ठरते त्यामुळे तुमच्या अगोदरच्या पोस्ट मुख्यपृष्ठावर आता दिसू शकणार नाहीत. मराठी ब्लॉग विश्वावरील दोषांमुळे तुमच्या अगोदरच्या नोंदी येथील वाचकांना दिसल्या नाहीत त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

तुम्हाला तुमच्या अगोदरच्या नोंदी येथील मुख्यपृष्ठावर दिसू लागाव्या याकरिता पुन्हा नव्या दिनांकेमध्ये प्रकाशित कराव्या लागतील.

- सहाय्यक

क्रमवारी पोस्टचे प्रकाशन

आपल्या मार्गदर्शना बद्दल आभार
सामंत

लेखनाची नोंद

संवेदना वर लेखन केले तर दिसत नव्हते, काही त्रुटी असल्यास तपासावे, ही नम्र विनंती !!!!

-दिलीप बिरुटे

नवीन नोंद प्रकाशित झाल्यावर दिसेल.

तुमची बीबीका मकबरा ही नोंद दिसत नसण्याचे मूळ कारण वर्डप्रेसच्या मुख्य फीडमधील दोष हे आहे. आम्ही पर्यायी फीड वापरून तो दोष दुरूस्त केला आहे.

तसेच येथे पहा: http://marathiblogs.net/node/572

तुमच्या ब्लॉगवरील नवीन नोंदी आता दिसावयास हव्या.

धन्यवाद !!!

अडचणींची तातडीने नोंद घेऊन मदत केल्याबद्दल आपले मनापासून आभार !!! :)

अंहं, अजूनही अड्चण आहेच.

नुकतेच प्रकाशित केलेली ’माझी कविता’ अजूनही इथे दिसत नाही :(

माझा पोस्ट प्रकाशित झाला नाही

आज ता.जुलै २७ २००८ रोजी सकाळी १०.४३ ला मी माझ्या साईटवर shrikrishnasamant.wordpress.com वर
लिहिलेला नवा पोस्ट "नव्हतो ग!मी सजणे असा" ह्या शिर्षकाचा
आपल्या साईटवर प्रकाशित झाला नाही
कृपया मदत करावी.
श्रीकृष्ण सामंत

email-----shrikrishnas@gmail.com

पोस्ट आता दिसू लागला

माझा पोस्ट आता मला दिसू लागला.मी प्रथम पाहिला तेव्हा माझ्या घड्याळात (अमेरिका पॅसिफिक टाईम) दुपारचे ३.४० झाले होते.आणि माझा पोस्ट वर टॉपवर होता.
आपल्या कडून मदतीचे प्रयत्न झाले असणार त्याबद्दल आपले धन्यवाद

सामंत

आज पुन्हा माझा पोस्ट प्रकाशित झाला नाही

"मानसिक भितीने ग्रासलेला गुरूनाथ" हा आज मी पोस्ट केलाला संध्याकाळी ६.२५ usa pT लेख आपल्या साईट्वर प्रकाशीत झाला नाही.आता एक तास होवून गेला तरी दिसला नाही.
पोस्ट केल्यावर माझ्या मेन पेजवर आपल्या "मराठी ब्लॉग icon"वर
one node received असं काही तरी एक लाईनची comment येत असे ती अलिकडे पोस्ट करताना दिसत नाही.असं माझं observation आहे
please help

सामंत

प्रकाशीत होण्याबाबत

आता सर्व काही ठिक चालले आहे
धन्यवाद