साधी-सोपी टेक्नॉलॉजी
"अॉल अवर कस्टमर केअर एक्झेक्युटिव्हज् आर असिस्टिंग अदर कस्टमर्स. प्लीज होल्ड द लाईन...," सुमारे २० मिनिटं हीच टेप एेकल्यानंतर राजेशचा पेशन्स संपला. इंग्रजीत एक सणसणीत शिवी हासडून आणि कंपनीच्या नावाचा योग्य उद्धार करून त्याने फोन चक्क आपटला. चांगल्या सेवेची खात्री देणार््््््या जाहिराती करून सेवा न देणार््या एका मोबाईल कंपनीचा तो उद्धार करत होता.
राजेशने सुमारे १५ ...