देवनागरी
Roman
Press F12 to toggle

“फलज्योतिषाचा शास्त्रीय आधार तपासणार” – डॉ. नारळीकरांचा पुढाकार.

“फलज्योतिषाचा शास्त्रीय आधार तपासणार” – डॉ. नारळीकरांचा पुढाकार. सर्व प्रकारच्या ज्योतिषांना प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन!

या वार्तेवर माझे विचार फलज्योतिष शास्त्रींच्या या परिषदेच्या चर्चा सत्रात विचारार्थ मांडत आहे.

फल ज्योतिषाबद्दल जनसामान्य लोकांत संशय व भ्रम उपस्थित करून ज्योतिषशास्त्राला बदनाम करण्याची युक्ती अंनिस सारख्या संस्था वारंवार करत असतात. अंनिसने सुचवलेली तपासणी प्रक्रियाच पुढे करून त्यांचा डाव त्यांच्यावर उलटवणे आपल्याला शक्य आहे. त्यासाठी परिणामकारक व कायमचा तोडगा शोधण्यासाठी आपण इथे उपस्थित राहून विचार करणार असलो तर काही प्रस्ताव मांडू इछितो.
1. अंनिस व त्यांच्या समविचारांच्या लोकांनी पोलिसी खाक्याने हे कुंडल्यांची तपासणी करण्याचे ठरवल्याने तसे करण्याचा त्यांचा अधिकार व योग्यता हा प्रश्न पुढे करून अशी तपासणी करण्याचे परिषदेने मान्य न करणे अगदी स्वाभाविक आहे. तथापि सामान्य जनांमधे आपल्या ज्योतिषशास्राच्या कार्याबद्दल आस्था कायम राहावी व त्यांच्या भावना व श्रद्धेला तडा जाऊ नये. लोकांची मनोधारणा ज्योतिषशास्त्राच्या विरोधात जाणार नाही, याची खबरदारी घेण्याची जबाबदारी परिषदेवर आहे.त्यामुळे अशी तपासणी करण्याचे आव्हान परिषदेला टाळून चालणार नाही. नाही तर विरोधकांनी लढाई न करताच विजय मिळवल्यासारखे होईल. भविष्यकाळात ते आणखी कुरापती काढण्याला उद्युक्त होतील. हे परिषद नाकारू शकणार नाही.
2. प्रस्ताव –
अ) या पुढे अंनिसने तपासणी असा शब्द न वापरता एकत्रितपणे हाती घेतलेले शोधकार्य असा उल्लेख सर्वत्र व नेहमी करण्याचे बंधनपूर्वक मान्य करावे.
आ) परिषदेतर्फे सर्व संस्थांच्या ज्योतिषींना प्रतिनिधित्व मिळेल अशा संख्येचा संघ तयार करावा. त्याच प्रमाणे अंनिसच्या बाजूने ज्यांनी ज्योतिष शास्त्राचा अभ्यास केलेला आहे पण त्या शास्त्राला काही कारणाने न मानणारे व अंनिसच्या विचाराने प्रेरित असे तितकेच प्रतिनिधी उपस्थित करावेत. आता दोन्हीकडून ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक प्रतिनिधी असल्याने परिषदेची शास्त्राच्या मूलभूत तथ्यांची प्रत्याक्षात शहानिशा (तपासणी नव्हे) करण्यास हरकत नसेल.
इ) अंनिसला ही अट मान्य होईल तर चांगलेच. तथापि, त्यांनी तसे मानायला नकार दिला (तेच जास्त शक्य आहे) तर परिषदेने आपणहून अंनिसने सुचवलेली कसोटी आपल्यातर्फे राबवावी.त्यामुळे लोकांच्या आपेक्षांची पूर्तीही होईल व अंनिस कशी अडेल तट्टू आहे याचा प्रत्यय ही लोकांना येईल. ज्योतिषशास्त्राची महानता लोकांना पटवून देण्याला परिषदेला आयतीच संधी मिळेल.
ई) अंनिस मागे हटली तर – १) परिषदेने पुढाकार घेऊन १०० मंदमती किंवा सव्यंग व्यक्तींच्या वेगळ्या कुंडल्या मिळवाव्यात. त्या पत्रिकांमधून ग्रहस्थिती व ज्योतिषशास्त्र पध्दतीच्या अन्य आडाख्यांवरून एक सर्वमान्य कोष्टक करावे. त्यामधून जमवलेल्या कुंडल्यांचा कोष्टकाशी कसा मेळ बसतो, ते दाखवून देण्याचे कार्य करण्याचे घोषित करावे. तसे करत असताना काही कुंडल्या या आडाख्यांशी न जुळणाऱ्या आढळल्या तर त्यांचे स्पष्टीकरण ही करून दाखवले जाईल असे ही प्रसिद्ध करावे. २) त्या कुंडल्या ज्या व्यक्तींच्या होत्या त्यांची नावे व शक्य झाल्यास त्या सव्यंग व्यक्तींना प्रसारमाध्यमांसमोर प्रत्यक्ष उभे करून उत्तर द्यावे. म्हणजे परिषदेने जमवलेल्या पत्रिका ज्योतिषांनी आपल्या मनाने बनवलेल्या आहेत असा आक्षेप विरोधकांना घेता येणार नाही.
उ) लाजेकाजेस्तव जर अंनिसने एकत्रितहोण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली तर त्यांच्या तर्फेच्या नेमलेल्या ज्योतिष शास्त्रींना परिषदेने उभे केलेले साक्षी पुरावे कसे अशास्त्रीय, तकलादू व भ्रामक आहेत ते साधार सिद्ध करावेच लागेल. शिवाय त्यांच्या त्या वक्तव्यावर परिषदेला पुढील ध्येय धोरण ठरवता येईल.
उ) या प्रस्तावामुळे अंनिसचे तोंडाळ नेते व उपद्वापी कार्यकर्ते, थोर शास्त्रज्ञ, शैक्षणिक संस्था मधे पडू शकत नाहीत हे ही आपोआप सिद्ध होईल.
ए) ज्योतिषपरिषदेला आवश्यक मान व दरारा मिळवण्यासाठी व पुढे तो तसाच राखण्यासाठी अशा तऱ्हेच्या शोधकार्याला वेगवेगळी क्षेत्रे निवडून वाहून घेणे भाग पडेल. एक सांघिक वेळापत्रक आखून अशा शोधकार्याचे काय पडताळे आले हे साधार दाखवून देण्याची संधी प्राप्त होईल. न जाणो या शोधकार्याला अंनिसच्या तर्फे ज्योतिषशास्त्राचे काम पाहाणारेही आपणहून साद देतील.
ऐ) अंनिस व परिषद एकत्र येऊन शोधकार्य करू इच्छित असतील तर सध्या आवाहन देणाऱ्या थोर व्यक्ती व शैक्षणिक संस्थांचा योग्य मान राखला जावा यासाठी त्यांची व परिषदेतर्फे परस्परांच्या सहमतीने ठरवलेल्या व्यक्तींचे एक मंडळ शोधकार्याचा ऑफिशियल निर्णय घोषित करण्यास बांधिल राहतील.

blog vishwatalya jyotishanni yavar tippani karavi

dhondopant joshi va anek itar manyavar jyotishi blog vishwache sadasya ahet. tyanni ya charchet sahabhag ghyava, ani matt mandave.

manasi.

फलज्योतिष

डॉ नारळीकराच्या नावाचा गैरवापर होत आहे. उद्या मी न्यूटन केप्लर आदि अनेकाचा उल्लेख माझ्या विषयांमधे करून लोकांचे लक्ष वेधू शकीन. त्या मुळे लोकांचा वेळ वाया जाईल. जर असे सारखे होत राहिले तर लोकांची विश्वासार्हता कमी होईल. म्हणून प्रशासकाने काही नियंत्रण ठेवावे ही नम्र विनंती

आपला प्रकाशसर