.....ड्रायव्हरनं एका दुकानापुढे गाडी उभी केली. दुकानात तोबा गर्दी. कोण काय करतंय काही कळत नव्हतं. भाजीबाजारासखा गोंधळ माजलेला. हवेत प्रचंड गारठा आणि थंडगार वारं सुटलेलं होतं. हे दुकान होतं रोहतांगमध्ये बर्फात घालायचे कपडे, स्किईंग्ज आणि शुज भाड्यानं मिळण्याचं. अखेरीस आम्ही आम्हाला साजेसे आणि मुख्य म्हणजे बसणारे कपडे घालून पुन्हा गाडीत बसलो. आता कपड्यांनी आम्ही चांगले जाडजूड ...