देवनागरी
Roman
Press F12 to toggle

पाउस

उन पाउस शुक्रवार, १६ मे २००८, १४:२६ (+०५:३०)

आनंदयात्री आनंदयात्री

कधीतरी कुठेतरी वाचलेल्या इंग्रजी कथेचा हा स्वैर अनुवाद ...

छत्रपती शिवाजी टर्मिनसवरनं निघालेली एक्सप्रेस यथावकाश मुंबईचा कोलाहल सोडुन सह्याद्रीच्या कुशीत शिरली. गार मोकळ्या वार्‍याने प्रवासी छान सुखावले, कुणी मासिकं-वर्तमानपत्र वाचु लागले तर कुणी बसल्या बसल्या पेंगु लागले. गाडी अगदी सगळ्या प्रकारचे-वयाचे लोक पोटात घेउन धावत होती, तरीही बहुतांश प्रवासी नोकरदार वर्ग ...