क्रिकेटचा अतिरेक होत चालला आहे. भारतीय क्रिकेट संघाला उसंत काही मिळत नाहीये. ऑस्ट्रेलियाहून परत आल्यावर २-३ आठवड्यातच परत आता दक्षिण अफ्रिकेशी सामने सुरू झालेत. चांगल्या क्रिकेट खेळाडूंची कारकीर्द १०-१२ वर्षांची असते. जर खेळाडू सामान्य दर्जाचा असेल तर बरीच कमी. ह्या छोट्या कारकीर्दीत जितके म्हणून सामने खेळता येतील तितके खेळून घ्यायचे असा साहजिकच प्रत्येक खेळाडूचा प्रयत्न ...