सध्या मुंबईत मराठी व उत्तर भारतीय यांच्यात जोरदार वाद सुरू आहे. या वादात तेल ओतून समाजवादी पक्षाचे खासदार अबू आझमी हिंदूंमध्ये उभी फूट पाडण्याच्या पाताळयंत्री प्रयत्नात आहेत. त्यामुळे दहशतवाद्यांचे फावणार आहे. उत्तर भारतियांनो, श्री शिवाजी महाराज होते म्हणून उत्तर हिंदुस्थान हिंदु राहिला, हे ओळखा आणि मराठी माणसांशी भांडणे करणे सोडा !
सावधान, दहशतवादी कारवायांसाठी मुंबईतील एकता संपवण्याचा देशद्रोह्यांचा विचार सुरू आहे !
शिवसेनेचे दोन गट आणि समाजवादी पक्ष यांच्यात सध्या भांडण चालू आहे. उत्तरप्रदेशातून मुंबईत एखादी टोळधाड यावी, तसे लोक रोजगारासाठी येतात आणि लुटारूवृत्तीने वागून मुंबईचा एकजिनसीपणा पुसून टाकतात, हा भांडणाचा विषय आहे. शिवसेनेच्या एका गटाचा उत्तरप्रदेशवासियांवर राग आहे. दुसरा गट त्यांचे स्वागत करत आहे. या मतभेदांचा लाभ उठवून समाजवादी पक्षाचे मुंबई प्रमुख खासदार अबू आझमी, ज्यामुळे मुंबईत हिंसाचार घडू शकेल, अशी प्रोत्साहनपर वक्तव्ये देत सुटले आहेत. या संबंधात लक्षात ठेवावयाची सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईवर सर्वांत मोठे संकट इस्लामी दहशतवादाचे आहे. इस्लामी दहशतवाद्यांची कारस्थाने विफल करायची असतील, तर त्याकरता मुंबईतील सर्व नागरिकांत एकजूट असणे आवश्यक आहे. तेव्हा इस्लामी दहशतवादाला पाठिंबा असलेले लोक मुंबईत हिंसाचार होऊन एकजूट मोेडेल, असा प्रयत्न करणार हे गृहित धरले पाहिजे.
मुंबई फक्त कष्टकर्यांनाच पावते !
मुंबईत येणारे परप्रांतीय, त्यांची वृत्ती, मराठी माणसांची इच्छाशक्ती आणि मुंबईवरील खरेखुरे संकट यांचा विचार या निमित्ताने झाला, तर कदाचित मुंबईला अराजकापासून वाचवता येईल. मुंबईत भारताच्या सर्व प्रांतांतून लोक मुक्कामाला येतात आणि त्यातील पुष्कळसे लोक त्याच प्रांतातल्यांपेक्षा मुंबईत पोटापाण्याचा उद्योगधंदा निश्चित मिळेल, या विश्वासाने येतात. मुंबई कष्टकर्याला आणि कल्पक माणसाला निराश करत नाही. मुंबईचे वैशिष्ट्य म्हणजे ती २४ तास जागी आणि कार्यमग्न असते. आपल्या प्रतिष्ठेचा फाजील बाऊ न करता जो वाटेल, ते कष्ट उपसण्यास सिद्ध असतो, त्याला मुंबईत पोटाला कमी मिळत नाही. अन्यत्र जी भाजी विकण्यालायक नसते, ती मुंबईत भिकार्याला विकली जाते. हाटात काही व्यापारी केवळ हिरव्या मिरच्या, कोथिंबिर, कडीपत्ता, आले, लिंबू विकायला बसतात, ते मिरच्यांचे ढीग रचतात. देवाण-घेवाणीत ज्या मिरच्या रस्त्यावर पडतात आणि गिऱ्हाईकांच्या पायाखाली येतात. त्याही उपाहारगृहवाल्यांना विकल्या जातात. त्या मिरच्या तळून बटाटेवडे आणि भज्यांसमवेत गिऱ्हाईकांना खायला घातल्या जातात. म्हणजे मुंबईत प्रत्येक वस्तूला किंमत असते. इतर प्रांतीय आपली किंमत टिकवून धरतात. दुर्दैवाने मराठी माणसाला आपली किंमत टिकवून ठेवता आलेली नाही.
मुंबईला महाराष्ट्राच्या संस्कृतीपासून वेगळे ठेवण्यामागे पं. नेहरु कारणीभूत !
मुंबईत मराठी माणसाच्या अस्तित्वालाच महत्व उरलेले नाही. मुंबईच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनावर मराठी माणसाची छाप हळूहळू कमी होत आहे. हे कसे झाले, याचा विचार ज्यांच्याकडून मराठी माणसांचे हितरक्षण अपेक्षित आहे, त्या सर्वांनी केला पाहिजे. पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु हे या सर्व प्रकरणात खलनायक आहेत, असे म्हणता येईल. त्यांची जी भूमिका गोव्याविषयी होती, तीच मुंबईविषयी होती. गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यात सिंहाचा वाटा मराठी माणसाचा आहे; पण नेहरूंनी गोवा स्वतंत्र झाल्यावर महाराष्ट्राला जोडला नाही. त्याची संस्कृती वेगळी आहे, असे सांगून तो केंद्रशासित केला. नेहरूंशी झगडून मराठी माणसाला मुंबई मिळवावी लागली आहे. मुंबई महाराष्ट्राला मिळावी, अशी नेहरूंची इच्छा नव्हती. संयुक्त महाराष्ट्रानंतर मुंबई राजधानी झाली आणि मराठी माणसाच्या हाती सत्ता आली; परंतु नेहरूनिष्ठा महाराष्ट्रनिष्ठेपेक्षा प्रभावी ठरली आणि नेहरूंची इच्छा लक्षात घेऊन सर्व मुख्यमंत्र्यांनी मुंबईवर मराठी माणसाचे प्रभुत्व रहाणार नाही, याची काळजी घेतली.
मराठी समाजानेही मुंबईवर वर्चस्व रहाण्यासाठी प्रयत्न केले नाहीत !
मुंबईतील काँग्रेस संघटनेला प्रादेशिक स्तरावर नेऊन ठेवण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षाची सत्ता मुंबईत मर्यादित करण्यात आली. गिरणी कामगारांची वाताहात होत असतांना सरकारने पाहिली. मुंबई प्रदेश काँग्रेसला गिरणी कामगारांशी देणेघेणे नव्हते. मराठी माणसाला वाजवी भावात घर देऊन त्याला मुंबईच्या बाहेर फेकले जावे लागणार नाही, अशी व्यवस्था सरकारने केली नाही. मराठी समाजानेही मुंबईवर आपले वर्चस्व रहावे म्हणून विशेषत्वाने काही केले नाही. मुंबईच्या उपाहारगृहात मराठी पदार्थ खायला मिळत नाही. मुंबईच्या चित्रपटगृहात मराठी चित्रपटाला जागा मिळत नाही. मुंबईत घराबाहेर पडला की मराठी माणूस मराठीत बोलायची सवय हरवून बसतो आहे. मुंबईवर आपले राज्य असावे, अशी स्वप्ने मराठी माणसाला पडत नाहीत. मराठी माणूस मराठी माणसाला फसवण्यात आघाडीवर आहे. मुंबईत विविध क्षेत्रांत शिखरावर पोहोचलेली मराठी माणसे आहेत; पण ती मराठी माणसाचे नेतृत्व करण्यास उत्सुक नाहीत.
परप्रांतांत रहाणारा मराठी माणूस त्या त्या संस्कृतीशी जुळवून घेतो, मग मुंबईत उत्तर भारतियांना का शक्य नाही ?
अशा परिस्थितीत मराठी माणसाने इतर भाषिकांसमवेत मुंबईत कसे रहावे ? इतर भाषिकांची कष्ट करण्याची सवय त्याने उचलावी. मराठी माणूस इतर प्रांतात वस्तीला जातो. तेव्हा तेथील भाषिकांसमवेत तो कसा रहातो, हे त्याने सगळयांना सांगावे. बडोदे, इंदूर, ग्वाल्हेर इत्यादी मोठमोठ्या संस्थानांवर मराठी माणसाने बराच काळ राज्य केले. हे प्रदेश हिंदवी साम्राज्याचे आधारस्तंभ होते आणि गायकवाड, होळकर, शिंदे हे पेशव्यांचे सरकार राज्यकारभाराचे आदर्श तेथे घालून देत होते. त्यांनी त्या प्रांतांची स्थानपरत्वे जी विशेषत: होती, ती नष्ट होऊन दिली नाही. उलट ती जोपासली. समृद्ध केली. मराठी संस्कृती आणि आपापल्या संस्थानातील स्थानिक संस्कृती यांचा सुरेख संगम या सरदारांनी घडवून आणला आणि सहजीवनाचा वस्तूपाठ उभा केला. मराठी माणूस कोठेही गेला तरी स्थानिक भाषा आणि संस्कृतीशी तो वैर करत नाही. दुरावा ठेवत नाही, तो त्या संस्कृतीचा स्वीकारार्ह भाग होऊन जातो. असे मुंबईतील सगळयाच अमराठी भाषिकांच्या विषयात म्हणता येत नाही. उत्तर प्रदेश आणि बिहार येथून तरुण मुले मुंबईत येतात. कष्ट करतात. रिक्शा चालवतात; पण ते मराठीत बोलत नाहीत. उलट उन्मत्तपणे वागतात. गिऱ्हाइकांशी त्यांचे वर्तन फसवाफसवीचे असते. मुंबईच्या उपनगरांत रिक्शा अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रिक्शा म्हातार्यांना उडवतात अणि रस्त्यावर तसेच सोडून पळतात. त्यामुळे मराठी माणूस आणि उत्तरप्रदेश-बिहारचा रिक्शावाला यांच्यात संघर्ष उघडणारच आहे; पण तो टाळायला हवा.
प्रांतीय वाद पेटवून हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे पाताळयंत्री कारस्थान !
कारण अशा संघर्षाचा लाभ अबू आझमीसारखे पातळयंत्री आणि विधीनिषेधशून्य लोक उठवणार आहेत. ज्यांना इस्लामिक दहशतवाद मोडून काढायचा आहे, त्यांनी अबू आझमीसारख्या राजकीय नेत्यांशी सावधपणे वागले पाहिजे. मराठी माणूस आणि उत्तरप्रदेशचा भैय्या यांच्यात संघर्ष उडाला, तर अबु आझमी त्यात इतके तेल ओतेल की, हिंदूंची एकजूट होणार नाही. त्यामुळे दहशतवाद्यांचे फावेल; म्हणून मुंबईतील परप्रांतियांना समान संकटाची जाणीव करून दिली पाहिजे. नवा ध्येयवाद दिला पाहिजे. मुंबईत जागांचे भाव इतके उंचावर जाणार आहेत की, मध्यमवर्गीय माणसाचे हात तेथपर्यंत पोहोचणार नाहीत. मग तो मराठी असो वा बिहारी असो. एका सदनिकेला न्यूनतम एक कोटी रुपये पडतील. तेवढे पैसे देऊन जागा विकत घेणे, त्यांनाच शक्य होईल, ज्यांना सौदी अरेबियातून पैसा मिळेल. पोर्तुगालने इंग्लंडच्या राजाला हंुडा म्हणून मुंबई दिली, तसे आपल्या राज्यकर्त्यांच्या नादानपणामुळे मुंबईसारखी महत्त्वाची नगरे सौदी अरेबियाला आंदण म्हणून या ना त्या रूपाने दिली जातील. या परिस्थितीत श्री शिवाजी महाराजांचे उदाहरण डोळयांसमोर ठेवल्याने धैर्य एकवटता येईल. श्री शिवाजी महाराज होते म्हणून उत्तर हिंदुस्थान हिंदु राहिला, हे या अडाणी भैय्यांना शांतपणे समजावून सांगावे लागणार आहे. म्हणजे मराठी माणसाशी भांडण करण्याचा विचार त्यांच्या मनात येणार नाही.