देवनागरी
Roman
Press F12 to toggle

travelogue

देवाची आळंदी - देहु शुक्रवार, ०२ मे २००८, १४:५१ (+०५:३०)

Vishnoosut ( विष्णुसूत) Vishnoosut travelogues ( विष्णुसूता ची भटकंती )

देवाची आळंदी - देहु
पुण्याला गेल्यावर काय काय करायचं हे नेहमी मी पुण्याला जायच्या आधी बरेच दिवस ठरवत असतो. एक मोठि लिस्ट तयार केली होती. त्या मधे खाणं, गाणं आणि फिरणं हे मुख्य होते.
खाण्या मधे ह्यावेळी न विसरता बेडेकर मिसळ, श्री मिसळ आणि श्रीकृष्ण मिसळ (तुळशी बाग) असे तीन दिवस सकाळ चे बेत झाले ! दुपारच्या वेळे मधे काहि जी काहि ठरवलेली कामं होती ती आणि रात्री टिळक स्मारक मंदिर, ...

हैद्राबाद्-सिकंदराबाद च्या आसपास ची मंदिरं सोमवार, २८ एप्रिल २००८, २२:०२ (+०५:३०)

Vishnoosut ( विष्णुसूत) Vishnoosut travelogues ( विष्णुसूता ची भटकंती )

हैद्राबाद्-सिकंदराबाद च्या आसपास ची मंदिरं एक तासाच्या "ड्रायविंग डिस्टन्स " वर आहेत

१. याडगिरी गुट्टा - नृसिंह मंदिर , अतिशय भक्तिपुर्ण व धार्मिक वातावरण. जवळच हनुमाना च एक जागृत स्थान आहे आणि स्नान कुंड आहे. ह्याच रस्त्या वर एक पंचमुखी हनुमान मंदिर आहे.

२. केसरगुट्टा - ह्याला किसरा गुट्टा असे हि म्हणतात. ह्या ठिकाणाची एक अतिशय मजेदार गोष्ट आहे. वनवासाच्या दरम्यान राम, ...

अंबाजोगाई - अक्कलकोट- पंढरपुर - गाणगापुर शनिवार, २६ एप्रिल २००८, ००:२६ (+०५:३०)

Vishnoosut ( विष्णुसूत) Vishnoosut travelogues ( विष्णुसूता ची भटकंती )

अंबाजोगाई - अक्कलकोट
हैद्राबाद वरुन एक-दोन दिवसाची ट्रिप साठि सोलापुर रोड च्या आजुबाजुची ठिकाणं म्हणजे.. लातुर च्या पुढे अंबेजोगाइ , अक्कलकोट- गाणगापुर आणि पंढरपुर अशी ड्रायविंग ट्रीप करण्यासारखी आहे.
ह्यातील अंबाजोगाई- अक्कलकोट हि ट्रीप एका दिवशी व पंढरपुर-गाणगापुर एका दिवशी अशी ट्रीप करण्याचा योग आला. इथे मी "ट्रीप केली" या ऐवेजी "योग आला" असं लिहितो त्याला कारण आहे. अनेकदा ...

शेगाव- घृष्णेश्वर- परळी वैजनाथ- ऑन्ढा नागनाथ शुक्रवार, २५ एप्रिल २००८, २३:०९ (+०५:३०)

Vishnoosut ( विष्णुसूत) Vishnoosut travelogues ( विष्णुसूता ची भटकंती )

शेगाव चे गजानन महाराज ,अक्कलकोट चे स्वामी समर्थ आणि शिर्डी चे साईबाबा , हे तीन महापुरुष दत्तात्रेय अवतार मानले जातात.
शेगाव ला जाण्यासाठि महाराष्ट्रातुन सर्व शहरांतुन लक्झरी बसेस ची सोय आहे. हैद्राबाद-इन्दोर ए सी-लक्झरी-स्लीपर बस संध्याकाळी ७ ला हैद्राबाद हुन निघते ती पहाटे ५ पर्यंत खामगाव ला सोडते. चांगल्या प्रकारची रहाण्याची व्यवस्था ही खामगाव ला आहे. शेगाव खामगाव पासुन ...

भटकंती,भेटी आणी बरचकाहि शुक्रवार, २५ एप्रिल २००८, २२:२८ (+०५:३०)

Vishnoosut ( विष्णुसूत) Vishnoosut travelogues ( विष्णुसूता ची भटकंती )

भटकंती,भेटी आणी बरचकाहि - ह्यात बरचकाहि म्हणजे काय ते मला अत्ता तरी माहित नाहि !
भटकंती करताना जे काहि अनुभव व आनंद मी घेतो त्यातील काहि वाचकांना मिळावा हि प्रामाणिक ईच्छा.
तसं तर आपलं आयुष्य म्हणजेच एक प्रकारची भटकंती असते पण येथे मी माझी भारतातील काहि ठिकाणांची भटकंती हि विशेषकरुन मांडणार आहे. ह्यात मुख्यतः खालिल ठिकाणांचा अनुभव असेल :
१. वाराणसी - काशी विश्वनाथ
२. ...

शिर्डी- भिमाशंकर- त्र्यंबकेश्वर शुक्रवार, २५ एप्रिल २००८, २२:१८ (+०५:३०)

Vishnoosut ( विष्णुसूत) Vishnoosut travelogues ( विष्णुसूता ची भटकंती )

शिर्डी- भिमाशंकर- त्र्यंबकेश्वर
हैद्राबाद वरुन शिर्डी ला जाण्यासाठी ए पी टी डि सी ( आन्ध्र टुरीझम) च्या आणि इतर खाजगी अनेक सोयी आहेत. आन्ध्रप्रदेशात शिर्डी साई भक्तांची संख्या हि बरीच जास्त असते. रात्री चा प्रवास व दिवसा शिर्डी मुक्काम अशी व्यवस्था असते. एसी, नॉन्-एसी, स्लीपर अशा सर्व प्रकारच्या बसेस ची सोय आहे.
शुक्रवारी रात्री हैद्राबाद वरुन निघुन पहाटे पाच-सहा ला शिर्डी ला ...

पुरी - जगन्नाथ-चिलका लेक- कोणार्क रविवार, २० एप्रिल २००८, १६:१४ (+०५:३०)

Vishnoosut ( विष्णुसूत) Vishnoosut travelogues ( विष्णुसूता ची भटकंती )

हैद्राबाद च्या नव्या विमानतळा वरुन माझा पहिला प्रवास भुवनेश्वर कडे होता. जी एम आर ग्रुप चा "राजीव गांधी इन्टरनॅशनल एअरपोर्ट " हा हैद्राबाद-सिकंदराबाद हुन ४०-४५ कि.मी अंतरा वर आहे. जरी विमानतळ आधुनिक असला तरी रस्ता फार खराब आहे त्या मुळे विमानतळा कडे जाण्या साठि २-२.३० तास लागतात. गर्दि च्या वेळी जास्तच !
भुवनेश्वर विमानतळा वरुन टॅक्सी ने जगन्नाथ पुरी ला पोहोचायला २ तास लागतात. ...

द्वारका, सोमनाथ, नागेश्वर रविवार, २० एप्रिल २००८, ०१:०२ (+०५:३०)

Vishnoosut ( विष्णुसूत) Vishnoosut travelogues ( विष्णुसूता ची भटकंती )

वृन्दावना च्या दर्शना नंतर मला द्वारके ला जाण्याची ओढ लागली होती. गुजरात मधे निवडणुका झाल्या नंतर नक्कि जाण्याचे ठरवलं. गुजराती जेवण मला अतिशय प्रिय आहे. सकाळी जामनगर ला जाणार्या विमानात शिरताना ठरवलं होत कि आज जेवायच ते एकदम द्वारके ला !
जामनगर विमानतळा वरुन द्वारकेला टॅक्सी नी अंदाजे १ - १.३० तास लागतो. दुपारी १-२ वाजता द्वारकाधिशा च्या नगरीत पोहचलो, मंदिराजवळच रहाण्याची ...

रामेश्वरम - गुरुवायुर रविवार, २० एप्रिल २००८, ०१:०० (+०५:३०)

Vishnoosut ( विष्णुसूत) Vishnoosut travelogues ( विष्णुसूता ची भटकंती )

रामेश्वरम आणि गुरुवायुर तसं बरेच दुर आहेत पण एकाच ट्रीप मधे मी हे करण्याचे ठरवलं. कोचीन च्या विमानतळा वरुन " एअरपोर्ट टू एअरपोर्ट " अशी टॅक्सी ठरवली. मला कोचीन चा विमानतळ फार आवडला. सगळ अतिशय शिस्तबद्ध आणि स्वच्छ वाटलं. हयाच कारण नंतर समजल. हा भारतातील पहिला "प्रायवेट" विमानतळ आहे. सरकारी हस्तक्षेप नसला म्हणजे सगळ कसं स्वच्छ आणि शिस्तबद्ध होउ शकत ह्याचं उदाहरण !
कोचीन वरुन ...

श्री शैल्य ( म) - तिरुपति बालाजी शुक्रवार, १८ एप्रिल २००८, २२:४० (+०५:३०)

Vishnoosut ( विष्णुसूत) Vishnoosut travelogues ( विष्णुसूता ची भटकंती )

श्री शैल्य ( म) - तिरुपति बालाजी
आन्ध्रप्रदेश मधे श्री शैल्य आणि तिरुपति बालाजी हि दोन क्षेत्रं अतिशय महत्त्वाची आहेत.
हैद्राबाद ला आल्या पासुन श्री शैल्यम ला जाण्याची इच्छा होती. एका दिवसात करता येण्या सारखी हि ट्रीप आहे. वाटेत जंगल हि सुदर आहे. शिवाय श्री शैल्यम धरण , नागार्जुन सागर धरण आणि इथिपोटला फॉल्स अतिशय सुन्दर आहेत.
पहाटे ४-४३० ला सिंकदराबाद वरुन निघालो आणि जुन्या ...